या वेळी पाणी व स्वच्छता मंत्रालय भारत सरकार यांच्या वतीने ओडीफ अंंतर्गत घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन स्वच्छता तपासणी पथक प्रमुख व संचालक पाणी व स्वच्छता मंत्रालयाचे जुनेद उस्मानीया, सुचिता देव, जुन्नर पंचायत समितीचे सभापती विशाल तांबे, बीडीओ शरदचंद्र माळी, जिल्हा परिषद समन्वयक पाणी व स्वच्छता विभाग विकास कुडवे आदी उपस्थित होते.
ग्रामपंचायतीने घनकचरा व्यवस्थापनाचा राबविलेला गोबरधन प्रकल्प केंद्र शासनाने पथदर्शी प्रकल्प म्हणून स्वीकार करून देशभरातील ग्रामपंचायतींसाठी ठिकेकरवाडीच्या धर्तीवर राबविला जात आहे. त्याबद्दल पाहणी करणाऱ्या पथकाने ठिकेकरवाडी ग्रामपंचायतचे कौतुक केले तसेच येथे तयार होणाऱ्या होणाऱ्या बायोस्लरी व प्रॉम खताची माहिती घेतली व भविष्यात याचे मार्केटिंगसाठी शासनस्तरावरून प्रयत्न करण्याचे आश्वासन जुनेद यांनी दिले. गावची अद्ययावत जिल्हा परिषद शाळा व ग्रामपंचायतीने राबविलेल्या विविध प्रकल्पांची देखील माहिती घेऊन सर्व अधिकारी वर्गाने समाधान व्यक्त केले.
--
फोटो क्रमांक : २३ ओतूर ठिकेकरवाडी
फोटो ओळी : ठिकेकरवाडी येथील प्रकल्पाची पाहणी करताना जुनेत उस्मानिया, सुचेता देव, विशाल तांबे आदी