विवेक भुसे पुणे : मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार वाहतूक पोलिसांनी आता हेल्मेटसक्ती बंद केली असा कोणाचा समज असेल, तर तो चुकीचा आहे़. त्यामुळे हेल्मेट न घालता तुम्ही शहरात फिरत असाल, तर वाहतूक पोलिसांचा तिसरा डोळा तुमच्यावर कधी रोखला जाईल व तुमच्या नावाने कधी चलन फाडले जाईल हे सायंकाळी एसएमएस मिळाल्यावरच समजेल़. हेल्मेट न वापरणाऱ्यांना सीसीटीव्हीने कैद केले असून, एका वाहनचालकाने हेल्मेट न घातल्यामुळे त्याला तब्बल १८ हजार ५०० रूपयांचा दंड आकारला आहे. वाहतूक पोलिसांनी आता हेल्मेटसक्तीसाठी प्रत्यक्ष पोलिसांचा वापर करण्याऐवजी सीसीटीव्हीमार्फत कारवाईवर भर दिला आहे़. १ जानेवारीपासून हेल्मेटसक्ती व अन्य वाहतूक नियमांच्या भंगाबाबत सीसीटीव्हीमार्फत केलेल्या कारवायांची एकत्र माहिती घेतली असून त्यात सर्वाधिक दंड झालेल्या दुचाकी चालकांची यादी तयार केली आहे़. त्यात पर्वती दर्शन येथील एका वाहन चालकावर तब्बल १८ हजार ५०० रुपये दंड आकारणी झाल्याचे निष्पन्न झाले आहे़ त्याखालोखाल कोथरुडमधील एकाला १५ हजार ३०० रुपये दंड झाला आहे़. ८ हजार व ८ हजार ५०० रुपये दंड झालेले तब्बल २५ दुचाकी वाहनचालक आहे़. तर ७ हजार व ७ हजार ५०० रुपये दंड झालेले २१ वाहनचालक आहेत़. त्यानंतर १० हजार व ९ हजार रुपये दंड झालेले प्रत्येकी १० वाहनचालक आहेत़. १२ हजार ६०० रुपये दंड झालेले ९ वाहनचालकांचा या यादीत समावेश आहे़. पर्वती दर्शन येथील वाहनचालकाला १८ हजार ७०० रुपये दंड झाला आहे़. याचा अर्थ त्याने हेल्मेट न घातल्याने त्याला किमान ३७ वेळा सीसीटीव्ही कॅमेऱ्याने पकडले व एका वेळा त्याने झेब्रा क्राँसिंगला उभा असताना पकडला गेला असावा़ असे दिसते़. या जास्तीतजास्त दंड झालेल्या पहिल्या शंभर वाहनचालकांमध्ये ५ हजार ५०० रुपये दंड झालेले शेवटी आहे़. हे पाहता ९८ जणांना किमान ५ हजार रुपयांपेक्षा अधिक दंड झाला आहे़. सीसीटीव्ही मार्फत कारवाई केल्यानंतर वाहनचालकाचा रजिस्टर असलेल्या मोबाईलवर पावती पाठविण्यात येते़. त्यांनी जवळच्या वाहतूक शाखेत किंवा कार्ड स्विप मशीन असलेल्या वाहतूक शाखेच्या पोलीस अधिकाऱ्यांकडे जाऊन कार्डमार्फत दंड भरावा अशा सूचना देण्यात आल्या आहेत़. गेल्या दोन महिन्यात वाहतूक शाखेने हेल्मेटसक्तीची अंमलबजावणी करताना दीड कोटी रुपयांहून अधिक रक्कमेची दंडाची कारवाई केली आहे़. मात्र, हा दंड भरण्याकडे वाहनचालकांनी दुर्लक्ष केले आहे़. त्यामुळे कोट्यवधी रुपयांची कारवाई केली असली तरी त्याची वसुल अद्याप झालेली नाही़. त्यामुळे आता पोलिसांनी दंड झालेल्या वाहनचालकांचे पत्ते मिळविले आहेत़. त्यांना दंडाबाबतची नोटीस पाठविण्याची प्रक्रिया सुरु केली आहे़.
सीसी टीव्ही मार्फत एकापेक्षा अधिक वेळा एकाच वाहनचालकावर केलेली कारवाईदंडाची रक्कम (रुपये) वाहनचालकांची संख्या१८ हजार ५०० ११५ हजार ३०० ११४ हजार २१३ हजार २१२ हजार ६०० ९११ हजार ५९ हजार १०८ हजार २५७ हजार २१६ हजार ५०० ५
अनेकांना १८ हजार ते ९ हजार रुपयांपर्यंत दंड करण्यात आला आहे़. आता १८ हजार रुपये दंड झालेल्या वाहनचालकाकडील दुचाकी जुनी असेल तर त्यांच्या गाडीच्या किंमतीपेक्षा त्याला झालेला दंड अधिक असण्याची शक्यता आहे़. अनेकदा वाहतूक नियमांचा भंग केलेल्या या वाहनचालकांची आम्ही यादी केली असून त्यांचे पत्ते मिळविले आहे़ त्यांच्या घरच्या पत्त्यावर नोटीस पाठविण्याची प्रक्रिया सुरु केली आहे़. - पंकज देशमुख, पोलीस उपायुक्त, वाहतूक शाखा
...........................
हेल्मेट नसल्यास ५०० रूपये दंड एकदा हेल्मेटविना आढळल्यास ५०० रूपये दंड आकारला जातो. त्याप्रमाणात जेवढ्या वेळा हेल्मेट नसलेले दुचाकीस्वार सीसीटीव्हीमध्ये कैद होतील, त्याप्रमाणात त्यांना दंड आकारला आहे. या सर्व वाहनचालकांना नोटीस पाठवून त्यांच्याकडून हा दंड वसुल केला जाणार आहे.