राज्यातील विविध जिल्ह्यांसह इतर राज्यांतून भाजीपाल्याची आवक जवळपास ९०-१०० ट्रक इतकी मार्केट यार्डात झाली आहे. गुजरात, कर्नाटक, आंध्र प्रदेश येथून ८-१० टेम्पो हिरव्या मिरचीची आवक झाली आहे. तामिळनाडू, आंध्र प्रदेश येथून ५-६ टेम्पो शेवग्याची, कर्नाटक, गुजरात येथून कोबीची ३-४ टेम्पो आवक झाली आहे. मध्यप्रदेश, गुजरात येथून लसूण ८-१० ट्रक, कर्नाटक येथून तोतापुरी कैरी ५-६ टेम्पो, इंदूर येथून ५-६ टेम्पो गाजर, कर्नाटक येथून २ टेम्पो घेवडा, हिमाचल प्रदेश येथून ३ ट्रक मटारची आवक झाली आहे. तसेच परराज्यातील इंदूर आणि आग्रा तर राज्यातील विविध जिल्ह्यांतून बटाट्याची ३०-३५ ट्रक आवक झाली आहे.
राज्यातील विविध जिल्ह्यांतून गवार ७-८ टेम्पो, सातारी आले १२०० पोती, भेंडी ७-८-टेम्पो, कोबी ५-६ टेम्पो, फ्लावर १०-१३ टेम्पो, भुईमूग शेंग १५०-१७५ पोती, सिमला मिरची ८-१० टेम्पो, तांबडा भोपळा ७-८ टेम्पो, कांदा ३०-३५ ट्रक, तर गावरान कैरीची १-२ टेम्पो आवक झाली आहे.
----
फळभाज्यांचे दहा किलोचे भाव :-
कांदा : १५०-१८०, बटाटा : ९०-१४०, लसूण : ५००-१०००, आले सातारी : १००-२००, भेंडी : २००-२५०, गवार : गावरान व सुरती २५०-३००, टोमॅटो : ६०-१००, दोडका : ३५०-४००, हिरवी मिरची : ३५०-४५०, दुधी भोपळा : १५०-२००, चवळी : २००-३००, काकडी : १००-१५०, कारली : हिरवी २५०-३००, पांढरी : २००-२२०, पापडी : ४००-४५०, पडवळ : २००-२२०, फ्लॉवर : १००-१२०, कोबी : १८०-२००, वांगी : ३००-४००, डिंगरी : २००-२५०, नवलकोल : १००-१२०, ढोबळी मिरची : २५०-३००, तोंडली : कळी २५०-३००, जाड : १४०-१५०, शेवगा : ४००-५५०, गाजर : २००-२५०, वालवर : ३५०-४००, बीट : १००-१२०, घेवडा : ७००-८००, कोहळा : १००-१५०, आर्वी : २००-२२०, घोसावळे : १८०-२००, ढेमसे : २००-२५०, मटार : परराज्य : ७००-८००, पावटा : ३००-५००, तांबडा भोपळा : ६०-१००, कैरी : तोतापुरी - १६०-२००, गावरान - १००-१५०, सुरण : २००-२२०, मका कणीस : ६०-१००, नारळ (शेकडा) : १०००-१६००.