पुणे : राज्यातील विविध जिल्ह्यांसह इतर राज्यांतून भाजीपाल्याची आवक चांगली झाली आहे. सुमारे ९० ते १०० ट्रक कोथिंबीर, मेथी, पालक, कोबी, फ्लॉवर, सिमला मिरची, हिरवी मिरची, शेवगा, गाजर व इतर भाजीपाल्याची आवक झाली.
गुजरात, कर्नाटक आणि आंध्र प्रदेश या राज्यातून हिरवी मिरची ८ ते १० टेम्पो, गुजरात, कर्नाटक येथून ३ ते ४ टेम्पो कोबी, आंध्र प्रदेश, तमिळनाडू ३ ते ४ टेम्पो शेवगा, इंदोरहून गाजर ४ ते ५ टेम्पो, कर्नाटकमधून घेवडा १ टेम्पो, आंध्र प्रदेशमधून पावटा १ टेम्पो, कर्नाटकमधून ४ ते ५ टेम्पो तोतापुरी कैरी, गुजरात, मध्य प्रदेशातून लसूण ८ ते १० ट्रक इतकी आवक झाली.
स्थानिक भागातून सातारी आल्याची ११०० पोती, भेंडी ७ ते ८ टेम्पो, गवार ७ ते ८ टेम्पो, टॉमेटो ६ ते ७ हजार पेटी, फ्लॅावर १० ते १२ टेम्पो, कोबी ५ ते ६ टेम्पो, भुईमूग शेंग १५० पोती, सिमला मिरची ८ ते १० टेम्पो, तांबडा भोपळा ८ ते १० टेम्पो, गावरान कैरी १ ते २ टेम्पो, कांद्याची ६० ते ६५ ट्रक, आग्रा, इंदौर, स्थानिक बटाट्याची ३० ते ३५ ट्रक आवक झाली.
--
फळभाज्यांचे दहा किलोचे भाव : कांदा :१५०-२२०, बटाटा : १००-१५०, लसूण :४००-११००, आले सातारी : १००-२००, भेंडी : २००-२५०, गवार : गावरान व सुरती ३००-४००, टोमॅटो : ५०-१००, दोडका : २५०-३००, हिरवी मिरची : २५०-३५०, दुधी भोपळा : १५०-२००, चवळी : २००-२२०, काकडी : १००-१५०, कारली : हिरवी ३००-३५०, पांढरी : २००-२५०, पापडी : ४००-४५०, पडवळ : २००-२५०, फ्लॉवर : १२०-१३०, कोबी : १३०-१५०, वांगी : ३००-४००, डिंगरी : १८०-२००, नवलकोल : ८०-१००, ढोबळी मिरची :२५०-४००, तोंडली : कळी २००-२५०, जाड : १००-१२०, शेवगा : ५००-६००, गाजर : २००-२२०, वालवर : ३००-३५०, बीट : ८०-१२०, घेवडा : ८००-१०००, कोहळा : १००-१५०, आर्वी : २५०-३००, घोसावळे : १८०-२००, ढेमसे : २००-२५०, भुईमुंग शेंग : २५०-३००,-मटार : परराज्य : ६००-८००, पावटा : ५००-६००, तांबडा भोपळा : १००-१२०, कैरी : तोतापुरी : ६०-२००, गावरान : १००-२००, सुरण : २००-२२०, मका कणीस : ५०-१००, नारळ (शेकडा) : १०००-१६००.
---
पालेभाज्यांमध्ये कोथिंबिरीची आवक दीड लाख जुडी झाली. तर मेथीची ५० हजार जुडीची आवक झाली.
---
पालेभाज्यांचे शेकड्यातील भाव :
कोथिंबीर : ६००-१२००, मेथी : १५००-२०००, शेपू : ६००-१०००, कांदापात : १३००-१८००, चाकवत : ७००-८००, करडई : ६००-८००, पुदिना : २००-४००, अंबाडी :३००-६००, मुळे : १०००-१५००, राजगिरा : ३००-५००, चुका : ५००-८००, चवळई : ३००-४००, पालक : ६००-८००.