प्राचीन काळात स्त्रियांची साडी आणि पुरुषांची दाढी याची क्रेझ होतीच, मात्र मध्यंतरीच्या काळात ती क्रेझ बऱ्यापैकी कमी झाली होती. विशेषत: बॉलिवूडमध्ये अनेक दशके साऱ्याच ॲक्टर्सनी चकचकीत चेहरा आणि बॉडी दिसण्यासाठी तीही चकचकीत करण्याची क्रेझ आली होती. त्याचा मोठा पगडा तरुणांवर दिसला आणि लग्नामध्ये नवरदेवांसह कुरवलेही घोटून घोटून दाढी करायचे. मात्र सुमारे दोन-तीन वर्षांपासून अचानक पुन्हा दाढीची क्रेझ वाढली, सध्या दाढी वाढविण्याची क्रेझ इतकी वाढली की जगात भारी असणाऱ्या भारतीय संघातील ७० टक्के खेळाडूंनी दाढी राखली, तर दुसरीकडे बॉलिवडूमधील रणबीरपासून ते रणवीरपर्यंत साऱ्यांनी दाढी राखत दाढीचा जमाना पुन्हा नव्याने आणला.
पूर्वी घरातील तरुण पोरांनी दाढी वाढवली की आई-बाबांपासून नातेवाईकांपर्यंत साऱ्यांकडून ती टीकेची धनी ठरयाची. काय अवतार केलाय इथपासून ते संन्यास घेऊन बुवाबाजी करणार की काय अशी टर उडवली जात होती, मात्र आता दाढी राखणं म्हणजे एक स्टाईल बनली. मात्र ती कशीही वाढविली तर आजही त्याला काय अवतार बनवलाय अशी कमेंट आली तर आश्चर्य वाटू नये. कारण दाढी वाढवणं सोपं असलं तरी ती सूट होईल असा त्याला शेप देणं आणि ती तशी राखणं हे तसं आणि रोजच्या रोज लक्ष देण्याचंच काम.
--
कोणत्या चेहऱ्यासाठी कशी राखावी दाढी
---
गोलाकार चेहरा : वैन डाइक बियर्ड, शॉर्ट बॉक्सड बियर्ड, बाल्बो बियर्ड, एंकर बियर्ड
आयताकार चेहरा : आयताकार चेहऱ्यासाठी मटनचॉप्स बियर्ड, गनसिलंगर बियर्ड, चिन स्टीप, चीन स्ट्रोकबियर्ड अशी दाढी अधिक शोभते.
उभट चेहरा : शेवरॉन बियर्ड. हॉर्स शू स्टाइल मिशी, फ्रेंच बियर्ड. सर्कल बियर्ड. रॉयल बियर्ड.
-
फोटो क्रमांक : २६पुणे दाढी