कामशेत : येथील ताजे गावातील द्रुतगती मार्गावरील पेट्रोल पंपाच्या हद्दीतील पार्किंग जागा व दुकानाच्या वादातून, तसेच जुन्या भांडणाच्या कारणावरून गावातील चार जणांनी इतर चार जणांच्या खुनाचा कट रचल्याची तक्रार पोलीस ठाण्यात दाखल केली आहे.कामशेत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नितीन ज्ञानेश्वर केदारी व गावातील बबन केदारी, सोमनाथ केदारी, उमेश केदारी (सर्व रा. ताजे, मावळ) यांनी फिर्याद दिली आहे.दि. २२ ते २५ दरम्यान किरण खंडू कोरडे, संतोष अशोक कोरडे, खंडू भगवान कुटे, समीर दत्ता केदारी (सर्व रा. ताजे, ता. मावळ) यांना द्रुतगती महामार्गालगतच्या कंपाउंडच्या आत ताजे पंपालगतच्या मोकळ्या जागेत अनधिकृतपणे पार्किंगची रक्कम वसूल करण्यास, तसेच ताजे पंपाच्या बाजूस असणाºया चहाच्या अनधिकृत टपरीस विरोध केला. त्यामुळे व जुने भांडणाच्या कारणावरून चिडून जाऊन त्यांनी आम्हाला ठार मारण्यासाठी आयुब शेख (रा. ताजे) यास सुपारी देण्याचा, तसेच पिस्तूलची व्यवस्था करण्याबाबत सांगितले असता, त्याने सुपारी न घेतल्याने व पिस्तुलाची व्यवस्था न केल्याने त्यांनी स्वत: तीन धारदार कोयते, एक चॉपर जमवून आम्हास ठार मारण्याचा कट केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या गुन्ह्याचा तपास उपनिरीक्षक चंद्रकांत कांबळे करीत आहेत.गाडीवर झाड कोसळलेपुणे : महाड-पंढरपूर मार्गावरील भोर येथील चौपाटी-रामबाग रस्त्यावर दुपारी दोनच्या सुमारास रस्त्याकडेच्या बंद चारचाकी पिकअप गाडीवर वडाचे, जांभळीचे झाड कोसळले. यामुळे या रस्त्यावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. सुरेश भालेघरे यांच्या पिकअप गाडीवर हे झाड कोसळले. या घटनेत एक लाख रुपयापर्यंत नुकसान झाले आहे. या घटनेची माहिती बांधकाम विभागाला कळताच कर्मचाºयांनी घटनास्थळी येऊन झाड बाजूला केले.
जुन्या भांडणातून खुनाच्या कटाचा प्रयत्न, चौघांविरुद्ध गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 05, 2017 12:24 AM