पुणे : वृद्ध महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावून नेणाऱ्या चोरट्यास गुन्हे शाखेच्या युनिट ३ ने अटक केली़. अमोन ऊर्फ सनी सॅमसंग कोल्हापूरे (वय ३२, रा़ न्यू मंगळवार पेठ, नरपतगिरी चौक) असे त्याचे नाव आहे़. त्याच्याकडून चोरीस गेलेली ४५ हजार रुपयांच्या सोनसाखळीचे दोन तुकडे जप्त करण्यात आले आहे़. अरुणा वागळे (वय ७०, रा़ रास्ता पेठ) या १२ जुलै रोजी पावणेसात वाजता बंडगार्डन येथील स्टेट बँक आॅफ इंडियाचे समोरील बॅनर्जी चौकातून पायी जात असताना एका चोरट्याने त्यांच्या गळ्यातील सोनसाखळी हिसका मारुन चोरुन नेली होती़. या गुन्ह्याचा समांतर तपास गुन्हे शाखेच्या युनिट ३ करुन केला जात होता़. आरोपीने घातलेले कपडे आणि त्याची देहयष्टी याची माहिती घेऊन सीसीटीव्हीच्या फुटेजचे तांत्रिक विश्लेषण केल्यावर त्या भागातून एकच पळत जात असल्याचे पोलीस नाईक अतुल साठे यांनी निष्पन्न केले़. सीसीटीव्ही फुटेजच्या अनुषंगाने वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिनकर मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार शिवानंद स्वामी, सुजित पवार, अतुल साठे यांनी स्थानिक नागरिकांकडे विचारपूस केली़. तेव्हा चोरलेली सोनसाखळी विकण्यासाठी तो पुणे स्टेशन येथील कॅफे ग्रँड हॉटेलजवळ येणार असल्याची माहिती मिळाली़ पोलिसांनी सापळा रचून सनी कोल्हापूरे याला पकडले़.
वृद्ध महिलेची सोनसाखळी चोरणारा जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2018 4:34 PM
बंडगार्डन येथील स्टेट बँक आॅफ इंडियाचे समोरील बॅनर्जी चौकातून पायी जात असताना एका चोरट्याने त्यांच्या गळ्यातील सोनसाखळी हिसका मारुन चोरुन नेली होती़.
ठळक मुद्देसीसीटीव्हीतून उघडकीस आला गुन्हा : २४ तासात अटक