पुणे : रिओ आॅलिम्पिकमध्ये उत्कृष्ट कामगिरी करून पदके खेचून आणणाऱ्या पी. व्ही. सिंधू, साक्षी मलिक, ललिता बाबर आणि दीपा कर्माकर यांना पुणे महापालिकेच्या वतीने ५ लाख रुपये रोख, सन्मानचिन्ह देऊन त्यांचा गौरव करण्यात येणार आहे.महापालिकेतील पक्षनेत्यांच्या बैठकीमध्ये याला मंजुरी देण्यात आली. महापौर प्रशांत जगताप यांनी पत्रकार परिषदेत याची माहिती दिली. लोकशाहीर पठ्ठे बापूराव पुरस्कर व विविध सत्कारमूर्तींची घोषणाही जगताप यांनी केली.महापालिकेच्या वतीने लोकनाट्य क्षेत्रातील ज्येष्ठ सहायक कलाकारास आणि एक उदयोन्मुख कलाकारास २१ हजार रुपये आणि स्मृतिचिन्ह देऊन कलाकारांचा गौरव करण्यात येणार आहे. २०१५ साठी पद्मजा कुलकर्णी, वैशाली गांगवे, बुवा डावळकर, गोविंद कुडाळकर, आशा मुसळे तर यंदाच्या वर्षासाठी सीमा पाटील, ज्ञानेश्वर बंड, शकुंतला सोनावणे, विठ्ठल थोरात-राशिनकर, रेखा परभणीकर यांची निवड करण्यात आली आहे. ‘चला हवा येऊ दया’ मधील कलाकारांचाही होणार सत्कार मराठीतील बहुचर्चित मालिका ठरलेल्या ‘चला हवा येऊ दया’ मधील प्रसिध्द कलाकार आणि निवेदक डॉ. निलेश साबळे, भालचंद्र कदम, कुशल बद्रिके, सागर कारंडे, भारत गणेशपुरे आणि श्रेया बुगडे यांचा सत्कार करण्यात येणार आहे.
आॅलिम्पिकवीरांचा पालिका करणार गौरव
By admin | Published: August 30, 2016 1:59 AM