शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदनगर जिल्हा बँकेने नोकर भरतीत आरक्षण वगळले; वाद पेटणार?
2
अंबाजोगाई - लातूर रोडवर भीषण अपघात; लातूर जिल्ह्यातील ४ जण जागीच ठार
3
मनोज जरांगेंची प्रकृती खालावली; बजरंग सोनवणेंचं मुख्यमंत्री अन् राज्यपालांना पत्र, म्हणाले...
4
जगन्नाथ मंदिराच्या तळघरात गुप्त खजिन्याचा घेणार शोध; लेझर स्कॅनिंगचा वापर
5
१४ दिवसांतच संग्राम चौगुलेची 'बिग बॉस मराठी'मधून एक्झिट, पोस्ट शेअर करत म्हणाला- "मला..."
6
स्वाभिमानी मणका तंदुरुस्त करून घ्या!; राज ठाकरेंची पुन्हा मराठी माणसांना हाक
7
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: महत्त्वाचा निर्णय घेण्यास दिवस अनुकूल नाही!
8
याही वेळी मुंबईत अपक्षांची संख्या लक्षणीय असणार? इच्छुकांमध्ये तिकिटासाठी रस्सीखेंच
9
पाकिस्तान मोदींना घाबरतो; आज पाकिस्तान गोळीबाराची हिंमतही करणार नाही
10
राष्ट्रवादीचे कार्यालय शरद पवार गटाचेच; लोकसभा सचिवालयाने दिले स्पष्टीकरण
11
तिरूपती लाडूबाबत अफवा पसरवणाऱ्यांवर गुन्हा; भेसळयुक्त तूप ‘अमूल’चे असल्याच्या पोस्ट
12
मुख्य निवडणूक आयुक्त ३ दिवस मुंबई दौऱ्यावर; विधानसभा निवडणुकीसाठी घेणार बैठका
13
भारतातील चाकरमानी दबले फायलींच्या ढिगाऱ्याखाली; ६१ टक्के जण आठवड्याला ४९ तासांपेक्षा अधिक राबतात
14
पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेत दाखल, ‘क्वाड’ शिखर परिषदेत सहभागी होणार
15
आतिशी यांच्या शपथविधीसाठी आलेले हे IAS अधिकारी कोण? जे केजरीवाल बोलत असताना हात जोडून उभे होते
16
Bigg Boss Marathi फेम अभिनेत्रीचं क्रॉप टॉप अन् डेनिम शॉर्ट्समध्ये बोल्ड फोटोशूट (Photos)
17
महाविकास आघाडीत कोणतीही बिघाडी होणार नाही; खासदार निलेश लंके यांना आत्मविश्वास
18
रिपाइं आठवले गटाचे उल्हासनगर शहर जिल्हाध्यक्ष भगवान भालेराव यांची पक्षातून हकालपट्टी
19
तुळजापुरातील बसस्टँडवर ओळख; लातूरमध्ये अत्याचार! संशयित शिक्षकासह तिघांविरुद्ध गुन्हा
20
वाळवा, शिराळा, पलूस, तासगाव तालुक्यासह सांगली जिल्ह्यात पुन्हा जोरदार पाऊस

संसदेच्या नव्या वास्तूत प्रवेश करताना आनंद आणि हुरहूर; खासदार सुप्रिया सुळे यांची सोशल मिडीयावर पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2023 10:00 PM

संसदेच्या या जुन्या वास्तूतील प्रवास आज थांबला आणि उद्यापासून ती नव्या वास्तूत स्थलांतरित होत आहे.

बारामती - संसदेच्या या जुन्या वास्तूतील प्रवास आज थांबला आणि उद्यापासून ती नव्या वास्तूत स्थलांतरित होत आहे. जुन्या वास्तूचा निरोप घेऊन नव्या वास्तूत प्रवेश करीत असताना एकाच वेळी आनंद आणि हुरहूर अशा दोन्ही भावना दाटून आल्या आहेत,अशा शब्दात खासदार सुप्रिया सुळे यांनी संसदेच्या नुतन वास्तूतील स`थलांतराबाबत सोशल मिडीयावर त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत.

   सुळे यांनी सोशल मिडीयावर म्हणतात, बारामती लोकसभा मतदारसंघाची प्रतिनिधी म्हणून २००९ साली सर्वप्रथम लोकसभेत आपण सर्वांनी मला निवडून दिले. तेंव्हापासून २०१४ आणि २०१९ असे सलग तीनवेळा आपण मला आपली प्रतिनिधी म्हणून निवडून लोकसभेत पाठविले.आजपर्यंत आपल्या सर्वांनी टाकलेला विश्वास सार्थ ठरविण्याचा प्रयत्न करीत महाराष्ट्रातील जनतेचा, समाजातील शेवटच्या माणसापासून प्रत्येक घटकाचा आवाज लोकशाहीच्या मंदिरात पोहचविण्याचा प्रांजळ प्रयत्न करत आहे. आपण मला हि संधी उपलब्ध करून दिली याबद्दल आपले सर्वांचे मनापासून आभार.

संसदेच्या या जुन्या वास्तूत अनेक उत्तुंग व्यक्तिमत्त्वांचाही सहवास लाभला. खुप काही शिकताही आलं.  नव्या वास्तूत प्रवेश करीत असताना एकाच वेळी आनंद आणि हुरहूर अशा दोन्ही भावना दाटून आल्याचे सुळे यांनी नमुद केले आहे.