लोकमत न्यूज नेटवर्क, सोमेश्वरनगर (जि. पुणे) : वादग्रस्त सनदी अधिकारी पूजा खेडकर यांच्या कुटुंबाचा आणखी एक कारनामा उघड झाला आहे. पूजा यांचे वडील दिलीप खेडकर यांनी बारामती तालुक्यातील वाघळवाडी येथे असलेल्या १४ गुंठे जमिनीच्या सातबाऱ्यावरील आपल्या नावातील वडिलांचे नाव बदलले आहे. दिलीप धोंडीबा खेडकरऐवजी आता नवीन नाव दिलीप कोंडीबा खेडकर असा बदल केला आहे.
दिलीप कोंडीबा खेडकर यांनी १४ वर्षांपूर्वी ही जमीन खरेदी केली आहे. त्याचा सातबाराही उपलब्ध झाला आहे. वाघळवाडी येथे दिलीप खेडकर यांची १४ गुंठे जमीन असल्याचे ट्वीट आरटीआय कार्यकर्ते विजय कुंभार यांनी केले होते. ही जमीन विक्री करायची असल्याने त्या ठिकाणी खेडकर कुटुंबीयांनी तसा बोर्ड लावला आहे. दीड कोटी जमिनीची किंमत असल्याचे सांगितले जात आहे.