पुणे : अक्षय तृतीयेला केलेली गोष्ट अनंत काळ टिकते. साडेतीन मुहुर्तांपैकी एक मुहूर्त म्हणून या दिवसाचं महत्व विशद केलं जातं. दुचाकी किंवा चारचाकी घेण्याआधी प्रत्येकजण शुभ मुहूर्त पाहत असतो. त्यामुळे या दिवशी वाहन खरेदी करणे योग्य मानले जाते. असे केल्याने त्या वाहनांमधून केलेला प्रवास सुरक्षित होतो अशी देखील काही लोकांची भावना आहे. पुण्यात मात्र गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा वाहनांची विक्री कमी झाल्याची माहिती प्रादेशिक परिवहन विभागाने दिलेल्या माहितीवरून स्पष्ट होत आहे.
दरवर्षी अक्षय तृतीया, बलिप्रतिपदा, गुढीपाडवा, दसरा या साडेतीन मुहूर्तांमध्ये मोठ्या प्रमाणात नवीन वाहन, घर अथवा नवीन कोणत्याही वस्तूची खरेदी केली जाते. गेल्या वर्षीच्या तुलनेत ९१ वाहने कमी नोंदणी गेल्याचे यंदाच्या आकडेवारीवरून दिसून येत आहे. तसेच यंदा गेल्या वर्षीपेक्षा वाहन विक्रीचे प्रमाण कमी असल्याचे वाहन विक्रेत्यांनी देखील सांगितले.२६ एप्रिल ते ३ मे २०२२ दरम्यान नोंदणी झालेली वाहने...१) दुचाकी - २ हजार ८४०२) कार - १ हजार ९७२३) गुड्स वाहने - २१३४) रिक्षा - ४०५) बस - ३८६) अन्य वाहने - ९५एकूण - ५ हजार १९८
१५ एप्रिल ते २२ एप्रिल २०२३ दरम्यान नोंदणी झालेली वाहने..१) दुचाकी - ३ हजार ५१२) कार - १ हजार ३४३३) गुड्स वाहने - ३२५४) रिक्षा - १८६५) बस - २३६) अन्य वाहने - २२४९८एकूण - ५ हजार १५२
२६ एप्रिल ते ३ मे २०२२ दरम्यान नोंदणी झालेली इलेक्ट्रिक वाहने...१) दुचाकी - ३९३२) कार - २८३) गुड्स वाहने - ०४४) रिक्षा - ००५) बस - ३६एकूण - ४६१
१५ एप्रिल ते २२ एप्रिल २०२३ दरम्यान नोंदणी झालेली इलेक्ट्रिक वाहने..१) दुचाकी - ३७०२) कार - २६३) गुड्स वाहने - ११४) रिक्षा - ०९५) बस - ००एकूण - ४१६