जेजुरी : अवघ्या महाराष्ट्राचे कुलदैवत असणाऱ्या तीर्थक्षेत्र जेजुरीच्या खंडोबा देवाची आज सोमवती अमावस्या यात्रा आहे. राज्यभरातून कुलदैवताच्या दर्शनासाठी भाविक जेजुरी गडावर येऊ लागले आहेत.
आज श्रावणातील शेवटचा सोमवार आणि अमावस्येचा पुण्य कालही आहे. तब्बल ७२ वर्षांनी असा योग आल्याने भाविकांनी काल रविवारपासूनच जेजुरीत गर्दी केली. आज पहाटेची पूजा, महाभिषेक उरकल्यानंतर मंदिर गाभारा दर्शनासाठी खुला करण्यात आला होता. गाभाऱ्यात फुलांची आकर्षक सजावट ही करण्यात आली आहे. सकाळी ११ वाजता देवाच्या उत्सवमूर्तीचा पालखी सोहळा जेजुरी गडावरून कऱ्हा स्नानसाठी निघणार आहे. सायंकाळी ४ वाजता कऱ्हेकाठी उत्सवमूर्तीनां विधिवत स्नान घालण्यात येणार आहे. भर सोमवती यात्रा भरणार असल्याने जेजुरीत भविकांची मोठी गर्दी राहणार आहे.