पाटस : संत तुकाराम महाराजांनी विठूरायाची भेट घेतल्यानंतर देहूकडे प्रस्थान ठेवले आहे. आज तुकोबांचे पुण्यात आगमन झाले. दौंडच्या पाटस येथे जगद्गुरू तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे परतीच्या मार्गावर ग्रामस्थांच्या वतीने उत्साहात स्वागत झाले. यावेळी येथील ग्रामदैवत श्री नागेश्वर मंदिरात पालखी विसाव्यासाठी होती.
ज्ञानेश्वर माउली तुकाराम जयघोषाने मंदिराचा परिसर दुमदुमला होता. तर पालखी मार्गावर रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास पालखीचे आगमन झाले. विविध धार्मिक विधी आटोपल्यानंतर दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास पालखी सोहळा पुढील गावाला जाण्यासाठी मार्गस्थ झाला. यावेळी मोठ्या संख्येने ग्रामस्थ पालखी सोहळ्याला निरोप देण्यासाठी उपस्थित होते.