इंदापूरात पुन्हा 'राजकीय भूकंप'! भाजपला सोडचिठ्ठी देत प्रशांत पाटलांचा राष्ट्रवादीत प्रवेश

By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2021 05:59 PM2021-07-16T17:59:47+5:302021-07-16T19:28:43+5:30

माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या घरात पडली फूट ; उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत प्रवेश

Once again 'Political earthquake' in Indapur taluka! Prashantrao Patil joins NCP | इंदापूरात पुन्हा 'राजकीय भूकंप'! भाजपला सोडचिठ्ठी देत प्रशांत पाटलांचा राष्ट्रवादीत प्रवेश

इंदापूरात पुन्हा 'राजकीय भूकंप'! भाजपला सोडचिठ्ठी देत प्रशांत पाटलांचा राष्ट्रवादीत प्रवेश

googlenewsNext

इंदापूर :  राज्याचे माजी सहकार व संसदीय कार्यमंत्री हर्षवर्धन पाटील यांचे सख्खे चुलत बंधू व इंदापूर पंचायत समितीचे माजी सभापती प्रशांत पाटील यांनी भारतीय जनता पार्टीला रामराम करत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. 

पुण्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये भाजप नेते प्रशांत पाटील यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात शुक्रवारी ( दि.१६ जुलै ) प्रवेश केला. यावेळी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीप गारटकर,  इंदापूर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक शिवाजीराव इजगुडे, दत्तात्रय घोगरे, तालुकाध्यक्ष हनुमंत कोकाटे पाटील, तालुका कार्याध्यक्ष अतुल झगडे,  इंदापूर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक शिवाजी इजगुडे, युवा उद्योजक रणजित घोगरे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी मोठया संख्येने उपस्थित होते. यावेळी पाटील यांचे चिरंजीव संग्राम पाटील, कुलदीप पाटील यांनी प्रवेश केला.

गेल्या काही दिवसांपासून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या संपर्कात माजी सभापती प्रशांत पाटील अनेक वेळा आले होते. १९९६ मध्ये पाटील यांनी बावड्याचे पाटील घराणे एकत्र करण्यासाठी मोलाची कामगिरी बजावली होती. अत्यंत अभ्यासू व आक्रमक म्हणून त्यांची इंदापूर तालुक्यात ओळख आहे.  

असा होणार परिणाम...  

प्रशांत पाटील यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिल्यामुळे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या राहत्या बावडा गावात व बावडा - लाखेवाडी जिल्हा परिषद मतदार संघात, तसेच इंदापूर तालुक्यात राजकीय प्रचंड मोठा परिणाम होणार आहे. सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांना पहिल्यांदाच बावडा येथील प्रसिद्ध असणाऱ्या पाटील घराण्यात जनाधार प्राप्त झाला आहे. इंदापूर तालुक्यातील भीमा सहकारी साखर कारखाना तसेच इतर संस्थांमध्येेेे व पंचायत समितीमध्ये पाटील यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीनेेे काम केले आहे. याचा फायदा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला इंदापूर तालुक्यात होणार आहे. 

ये तो ट्रेलर हैं, पिक्चर अभी बाकी हैं...! 
इंदापूर पंचायत समितीचे माजी सभापती प्रशांत पाटील प्रवेश केल्यानंतर म्हणाले, इंदापूर तालुक्याची जडण-घडण काँग्रेस विचारातून झाल्यामुळे आमची भाजपमध्ये प्रचंड घुसमट होत होती. इंदापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस बलवान बनवण्यासाठी मनापासून प्रयत्न करणार अशी ग्वाही 
दिली.  माझा प्रवेश म्हणजे, ये तो ट्रेलर हैं, पिक्चर अभी बाकी हैं.. अशी प्रतिक्रिया पाटील यांनी दिली.

इंदापूर तालुक्यात राष्ट्रवादीला बळकटी मिळणार.. 
पाटील यांना सामाजिक राजकीय कामाचा अत्यंत सखोल अनुभव असल्यामुळे व बावडा परिसरात अनेक कुटुंबांची ऋणानुबंध पाटील यांचे असल्यामुळे इंदापूर तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे संघटन दमदार होण्यासाठी मदत होईल अशी माहिती पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी दिली.

Web Title: Once again 'Political earthquake' in Indapur taluka! Prashantrao Patil joins NCP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.