शहरं
Join us  
Trending Stories
1
मतांमधील तफावतीबाबत 'लोकमत'च्या बातमीवर निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण, म्हणाले...
2
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
3
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: प्रिय व्यक्तीच्या सहवासात रोमांचित व्हाल!
4
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
5
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
6
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
7
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
8
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
9
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
10
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
11
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
12
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
13
विद्यार्थ्यांच्या नोंदणीसाठी शिक्षकांचे 'अपार' कष्ट; २५ टक्के नोंदणी अपूर्ण
14
शेती आणि शेतकरी - यंदाच्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतून दोघेही हद्दपार!
15
‘कॉर्पोरेट’ प्रचार, फतवे अन् व्हायरल इंडिया; निवडणुकीचा प्रचार झालाय हाय-टेक
16
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

महापालिकेच्या पथ व पाणी पुरवठा विभागाच्या समन्वयाअभावी रस्त्यांची ‘खोदाई पे खोदाई ’  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 02, 2019 12:49 PM

नगरसेवकांनी हे आर्थिक वर्ष संपण्याआधी स यादीमधील निधी संपविण्यासाठी कामांचा धडाका लावला आहे.

ठळक मुद्देडांबरी,सिमेंटच्या रस्त्यांचे काम सुरु तेथे पाणी पुरवठ्याची जलवाहिनी टाकण्यासाठी पुन्हा खोदकाम

पुणे : पथ आणि पाणी पुरवठा विभागामधील समन्वयाअभावी शहरामध्ये तयार करण्यात येत असलेले रस्ते पुन्हा खोदावे लागण्याची चिन्हे दिसत आहेत. २४ तास पाणी पुरवठा योजनेचे या रस्त्यांवर काम करण्याचे प्रस्ताव पथ विभागाकडे पडून आहेत. त्यामुळे ज्या ठिकाणी डांबरी तसेच सिमेंटच्या रस्त्यांचे काम सुरु आहे; तेथे २४ तास पाणी पुरवठ्याची जलवाहिनी टाकण्यासाठी पुन्हा खोदकाम करावे लागणार आहे. संपुर्ण महापालिका क्षेत्रातील नागरिकांना समान पाणी पुरवठा व्हावा, तसेच पाणी गळती थांबविण्याकरिता २४ तास पाणी पुरवठा योजना राबविण्यात येत आहे. शहरामध्ये अनेक ठिकाणी जलवाहिन्या टाकण्याचे काम सुरु आहे. तसेच ५० पेक्षा अधिक ठिकाणी पाणी मीटरही बसविण्यात आलेले आहेत. शहराला समान पाणी देण्याकरिता पाणी पुरवठा विभागाकडून १८०० किलोमीटर लांबीची जलवाहिनी टाकण्यात येणार आहे.पाणी पुरवठा विभागाने ३५० किलोमीटर लांबीचे पाईप घेतले आहेत. त्यासाठी ३५० किलोमीटरची खोदाई करण्यास परवानगी मागणारे प्रस्ताव पाणी पुरवठा विभागाने पथ विभागाकडे दिले आहेत. मात्र, अवघ्या ५६ किमी लांबीच्या खोदाईस परवानगी देण्यात आली आहे. विमान नगर, कोथरूड, बाणेर, औंध, एरंडवणा या परिसरात रस्त्याची कामे सुरू होण्यापूर्वी योजनेतील जलवाहिनी टाकण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यातील ५ किलो मीटरचे काम पूर्ण झाले आहे. नगरसेवकांनी हे आर्थिक वर्ष संपण्याआधी स यादीमधील निधी संपविण्यासाठी कामांचा धडाका लावला आहे. रस्त्यांच्या डांबरीकरणासोबतच सिमेंटीकरण करण्यात येत आहे. अनेक भागातील रस्ते उखडण्यात आलेले आहेत. रस्ता खोदल्यानंतर तेथे पाणी पुरवठा योजनेची वाहिनी टाकण्याची परवानगी मिळावी यासाठी पाणी पुरवठा विभागाकडून पाठपुरावा सुरु आहे. मात्र, पथ विभागाकडून त्याला प्रतिसाद दिला जात नसल्याचे चित्र आहे. =====सध्या शहरात रस्त्यांची कामे सुरु आहेत. तेथे जलवाहिनी टाकण्यासाठी परवानगी देण्या संदर्भातील प्रस्ताव पथ विभागाला देण्यात आलेले आहेत. पाणी पुरवठा विभागाकडे ३५० किलोमीटर लांबीचे पाईप आलेले आहेत. त्यामध्ये ६, १०, १२, १८ व्यासाच्या पाईप्सचा समावेश आहे. मात्र, पथ विभागाने अद्याप या प्रस्तावावर निर्णय दिलेला नाही. ७ फूट व्यासाच्या मुख्य वाहिनीचेही काम चालू महिन्यात हाती घेण्याचे नियोजन आहे. - व्ही. जी. कुलकर्णी, विभागप्रमुख, पाणीपुरवठा विभाग

टॅग्स :PuneपुणेPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाroad transportरस्ते वाहतूक