पुणे : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पानशेत, वरसगाव, खडकवासला, टेमघर या धरण परिसरामध्ये पावसाची संततधार सुरूच असून त्यातून धरणामध्ये वेगाने पाणीसाठा होऊ लागला आहे. गेल्या २४ तासामध्ये चारही धरणांमध्ये मिळून दिड टीएमसी पाण्याचा साठा झाला आहे. एकूण ८.९५ टिएमसी पाणी चारही धरणांमध्ये जमा झाले असून एकूण ३०.७१ टक्के धरणसाठा झाला आहे. जुलै महिन्याला सुरूवात होताच पावसाचे आगमन झाले, गेल्या दहा दिवसांमध्ये खडकवासला साखळीतील धरणसाठयात वेगाने वाढ होऊन तो ८. ९५ टिएमसीवर जाऊन पोहचला आहे. चारही धरणात मिळून एकूण ३०.७१ टक्के इतका पाणीसाठा झाला आहे. धरण परिसरातील पावसाचा वेग कमी झाला असला तरी संततधार सुरूच असल्याने पाण्यासाठा वाढत आहे. मागील वर्षी याच दिवशी धरणांमध्ये ७.२४ टिएमसी साठा होता. रविवारी सकाळपासून धरण परिसरामध्ये टेमघर ५७ , वरसगाव २८, पानशेत ३१, खडकवासला १४ मिलीमिटर पावसाची नोंद झाली. टेमघर धरणामध्ये ०.६५, पानशेत ३. ८१, वरसगाव ३.३०, खडकवासला १.१९ टिएमसी पाणीसाठा झाला आहे. एकूण ८.९५ टिएमसी पाणी जमा झाले असून एकूण ३०.७१ टक्के पाणीसाठा झाला आहे. तसेच पिंपरी-चिंचवडमध्येही पाणीसाठ्यात वाढ झाली आहे.(प्रतिनिधी)लोणावळा : लोणावळ्यात शनिवारी रात्र्लोणावळ्यात दिवसभरात ७२ मिमी पाऊसाीपासून पावसाचा जोर वाढला असून, आज दिवसभरात लोणावळ्यात तब्बल ७२ मिमी पाऊस झाला आहे. पावसाचा जोर कायम असून, पावसाच्या जोरदार सरी शहरात कोसळत आहेत. लोणावळ्यात आजअखेर १३१३ मिमी पाऊस झाला आहे. या वर्षी केवळ जुलै महिन्यात आठवडाभर झालेल्या पावसाने मागील वर्षीची आजअखेरपर्यंतची सरासरी ओलांडली आहे.दरम्यान लोणावळ्याच्या ग्रामीण भागामध्येही दिवसभर पाऊस सुरू होता. त्यामुळे भात लावणीचे कामे सुरू होती. भूगर्भातील पाणीसाठा वाढल्याने शेतकऱ्यांमधूनही समाधान व्यक्त होत आहे. (वार्ताहर)
धरणांत २४ तासांत दीड टीएमसी साठा
By admin | Published: July 11, 2016 12:37 AM