शिरूर तालुका वाढती कोरोना बाधित संख्या लक्षात घेता शिरूर तालुक्यात दुसरी कोरोनाची लाट पसरत आहे अशी भीती वाटू लागली आहे.
शिरूर तालुक्यात आज पर्यंत १० हजार ८७५ कोरोना बाधित रुग्ण आढळले असून ८६१५ कोरोना बाधित रुग्णांनी कोरोना वर मात केली आहे. १९२ जणांचा मृत्यू झाला आहे तर २०६८ विविध रुग्णालयात उपचार घेत आहे.
शिरूर तालुक्यात आज सणसवाडी ७, शिक्रापूर ३०, तळेगाव ढमढेरे ३, पारोडी २,दरेकर वाडी १, बुरुंजवाडी ३,कोरेगाव भीमा ३,रांजणगाव गणपती ८,,पिंपरी दुमाला १, मांडवगण फराटा ३, वडगाव रासाई ११, , शिरसगाव काटा १, तांदळी ४, न्हावरे ६, उरळगाव २,नागरगाव २, गुनाट ३, आलेगाव पागा २, शिंदोडीी ४, आंबळे १, आंधळगाव १,निमोने २,जांबुत ११,वडनेर खुर्द ४,म्हसे बुद्रुक १,,टाकळीहाजी १४,कारेगाव २, शिरूर ग्रामीण ३३, बाभूळखुर्द १, मलटण २, करंदी १,पाबळ २
शिरूर शहर ४
असे शिरूर तालुक्यातील ३३ गावात १४९ कोरोना बाधित रुग्ण आढळले आहे. तर तिघा जणांचा मृत्यू झाला आहे.
--
कोट
--
शिरूर तालुक्यात वाढता कोरोना बाधित यांचा आकडा चिंताजनक असून, नागरिकांनी सतर्क राहणे गरजेचे आहे. तोंडाला मास्क लावणे, गर्दी करू नये ,गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये ,सोशल डिस्टन्स पाळावी व शासनाने दिलेल्या नियमांचे पालन करावी असे आव्हान शिरूर तालुका वैद्यकीय अधिकारी दामोदर मोरे यांनी केले आहे.