इंदापूर तालुक्यात नऊ प्राथमिक आरोग्य केंद्र व एक तालुका रुग्णालयाच्या माध्यमातून २६ जुलै अखेर ६० वर्षांवरील सुमारे ३७,२८७ नागरिकांना पहिला डोस तर, १५,५३७ नागरिकांना दुसरा डोस देण्यात आला आहे. त्याचप्रमाणे वय वर्ष ४५ ते ५९ दरम्यान असलेल्या ४१,१९४ नागरिकांना पहिला डोस व २०,३१५ नागरिकांना दुसरा डोस देण्यात आला आहे. १८ ते ४४ दरम्यानच्या २०,४२३ नागरिकांना पहिला व ११७५ नागरिकांना दुसरा डोस देण्यात आला आहे. दीड लाखाचा टप्पा पूर्ण करण्यात आला आहे. तालुक्यासाठी ही दिलासा देणारी बाबा आहे. आरोग्य विभागाच्या नियोजनबद्ध कामगिरीमुळे दीड लाख नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. मोठ्या प्रमाणात लसीकरण करण्यात करण्यात आले असल्याने तालुक्यातील कोरोनाचा संसर्गदेखील आटोक्यात आला आहे.
इंदापूर तालुक्यात लसीकरणाचा दीड लाखाचा टप्पा पूर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2021 4:10 AM