मागील २७ दिवसांत नारायणगावमध्ये १३८ रुग्ण ,जुन्नर मध्ये १५३ रुग्ण,ओतूर ग्रामपंचायतीत ९९ असे एकून ३९० रुग्ण आढळले आहेत .तर इतर रुग्ण तालुक्यातील अन्य गावातील आहेत. मार्च २०२० पासून वर्षभरात ८ हजार २१५ रुग्ण आढळले. यातील ६ हजार ९९४ रुग्ण बरे झालेत तर २७८ रुग्णांचा आत्तापर्यंत मृत्यू झाला आहे सध्या स्थितीत ९४८ रुग्ण सक्रिय आहेत .जुन्नर हे तालुक्याचे ठिकाण आहे परिणामी शासकीय कामासाठी मोठ्या प्रमाणात नागरिक जुन्नर येथे येत असतात. तर नारायणगाव व ओतूर ही गावे महामार्गालगत आहेत परिणामी येथे मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. तसेच व्यापार व्यवसायाच्या दृष्टीने मोठ्या प्रमाणात शेतकरी वर्ग येत असल्याने येथे रुग्ण संख्या वाढती असल्याचे चित्र दिसत आहे
जुन्नर तालुक्यात २७ दिवसांत दीड हजार कोरोनाबाधित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 09, 2021 4:11 AM