सदर गुन्ह्याचा तपास करत असताना पेट्रोल पंपावर असलेल्या सीसीटीव्ही फुटेज तसेच तांत्रिक विश्लेषणातून आणि गोपनीय बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीच्या आधारे संतोषनगर, कात्रज, पुणे येथे राहणारा रामधन भागीरथी विश्वकर्मा याच्या राहत्या घरी उत्तर प्रदेशची दोन मुले आली होती व त्यांच्याकडे पिस्तूल होते, अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने रामधन विश्वकर्मा याचा शोध घेतला असता दत्तनगर चौक, कात्रज पुणे येथून ताब्यात घेतले. त्यास राजगड पोलीस स्टेशनच्या ताब्यात दिले आहे.
सदर गुन्ह्याचा तपास पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते, पोलिस उपअधीक्षक धनंजय पाटील यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली अमोल गोरे, राजू मोमीन, अमोल शेडगे, मंगेश भगत, अक्षय नवले, अक्षय जावळे, प्रमोद नवले, राजेंद्र थोरात, ज्ञानेश्वर क्षीरसागर, गुरू जाधव, प्रसन्न घाडगे यांनी केली आहे.