बारामती : बारामती शहरातील एकाचा डेंग्यूमुळे शनिवारी (दि. 1) मृत्यू झाला. पुणो शहरातील खासगी रुग्णालयात या रुग्णावर उपचार सुरू होते.
मोहनराव जिजाबा पवार (रा. दीपलक्ष्मी, दुधसंघ सोसायटी, साईनगर) असे या रुग्णाचे नाव आहे. पवार यांना गुरूवारी (दि. 3क् ऑक्टोबर) बारामती शहरातील देवकाते हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. यावेळी त्यांना ताप येणो, रक्तदाबाचा त्रस जाणवत होता. त्यांना हृदयाचा आजार असल्याचे त्यांच्यावर उपचार करणारे डॉ. पेमेंद्र देवकाते यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. त्यांच्या शरीरातील पांढ:या पेशी (प्लेटलेट्स) 17 हजारार्पयत कमी झाल्या होत्या. त्या प्लेटलेट्स देखील त्यांना देण्यात आल्या होत्या. मात्र, शुक्रवारी (दि. 31) सकाळी त्यांच्या हृदयाचे ठोके वाढले. तसेच रक्तदाब कमी झाला. त्यामुळे त्यांना पुणो येथे उपचारासाठी पाठविण्यात आले होते, असे डॉ. देवकाते यांनी सांगितले. दरम्यान, पवार यांचा पुणो शहरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना शनिवारी सकाळी मृत्यू झाला. (प्रतिनिधी)
4सुपे : मागील आठवडयात झालेल्या वातावरणातील बदलामुळे सुपे (ता. बारामती) परिसरात विषाणुजन्य, गोचीड ताप आदी रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. नारोळी, पानसरेवाडी आणि सुपे आदी ठिकाणी डेंग्युचे रुग्ण आढळुन आले आहेत. त्यामुळे सद्या नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान शासनाच्या आरोग्य विभागाच्यावतीने त्वरित उपाय योजना करण्याची मागणी परिसरातील ग्रामस्थांनी केली.येथील शासकिय ग्रामिण रुग्णालयात वातावरणातील बदलामुळे सर्दी-खोकला, जुलाब-उलटया आदी विषाणुजन्य तापांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. येथील रुग्णालयात विषमज्वराचे 3 ते 4 रुग्ण उपचार घेत आहेत. तसेच डेंग्यु सदृश्य रुग्ण आढळुन आला आहे. मात्र हा रुग्ण नारोळी येथील आहे. तो सध्या पुणो येथे वास्तव्यास आहे. रुग्णाची तब्येत बिघडल्याने येथील ग्रामिण रुग्णालयात उपचार सुरु करण्यात आले. त्याच्या पांढ-या पेशींची संख्या खालावली आहे. त्याच्या रक्ताच्या चाचण्या करण्यात आल्या. यावेळी त्याला डेंग्यूसदृश्य आजाराची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे,अशी माहिती ग्रामिण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. डी. व्ही. ङोंडे यांनी दिली.