पुणे : गुंतवणुकीचा दामदुप्पट परतावा, पीएफवर टॅक्स म्हणून, टॉवर बसविण्याच्या आमिषाने, कर्ज मंजूर करून देतो असे सांगून आणि आई आजारी असल्याचा बहाणा करीत पाच घटनांत ४ लाख ३१ हजार रुपयांची फसवणूक झाल्याप्रकरणी डेक्कन, विश्रामबाग, सिंहगड, सहकारनगर आणि कोंढवा पोलिसांत गुन्हे दाखल झाले आहेत.पहिल्या प्रकरणात आई आजारी असल्याचे सांगून सव्वालाख रुपये उकळून ज्येष्ठाला गंडा घालण्यात आला. याप्रकरणी ७२ वर्षीय नागरिकाने विश्रामबाग पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे. त्यानुसार, चंद्रशेखर नावाच्या व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चंद्रशेखरने आई आजारी असल्याने पैशांची आवश्यकता असल्याचा बहाणा करून फिर्यादींचा विश्वास संपादन केला. त्यानुसार फिर्यादींनी उपचारासाठी सव्वा लाख रुपये भरले. मात्र आरोपीने केवळ ५०० रुपये परत करीत फसवणूक केली. अधिक तपास पोलीस निरीक्षक (गुन्हे) अमृत मराठे करीत आहेत. दुसऱ्या घटनेत एका महिलेची पीएफवर नॉमिनी असल्याचे सांगून ३१ हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली. याबाबत, ५३ वर्षीय महिलेने डेक्कन पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे. तिसºया गुन्ह्यात नामांकित मोबाइल कंपनीचे टॉवर बसवून देण्याचे आमिष दाखवून २ लाख २५ हजार रुपये उकळले. याप्रकरणी धनकवडी येथे राहणाºया एका व्यक्तीने दिलेल्या फिर्यादीवर मोबाइलधारकाविरोधात सहकारनगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.चौथ्या प्रकारात खासगी फायनान्स कंपनीद्वारे वीस लाख रुपयांचे कर्ज मिळवून देऊ असे बतावणी करीत महिलेसह तिघांनी एका व्यक्तीकडून ३४ हजार ५०० रुपये घेत त्याची फसवणूक केली. सुदर्शन कुमार (वय ३५,रा.हांडेवाडीरोड) यांनी फिर्याद दिली आहे.इन्स्टाग्रामवरील मैत्री पडली महागातइन्स्टाग्रामच्या माध्यमातून ओळख झालेल्या व्यक्तीवर विश्वास ठेवणे एका विद्यार्थ्यास चांगलेच महागात पडले आहे. गुंतवलेली रक्कम अल्पकालावधीत दामदुप्पट करण्याचे आमिष दाखवून आरोपीने फिर्यादी यांची १६ हजार रुपये घेत फसवणूक कली. याप्रकरणी एका २१ वर्षीय तरुणाने फिर्याद दिली आहे, त्यानुसार सिंहगड रोड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणाचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक सरदार पाटील करीत आहेत.
एकाच दिवसात फसवणुकीचे ५ गुन्हे दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2019 3:15 AM