पुणे : राज्यभरात मराठा समाजाला अारक्षण मिळावे यासाठी अांदाेलन करण्यात येत अाहे. पुण्यातील अडते-व्यापारी संघटना तसेच हमाल-कामगार संघटनेच्या वतीने मराठा अारक्षणाच्या मागणीला पाठिंबा देण्यासाठी अाज एकदिवसीय संप पुकारला अाहे.
राज्यभरात मराठा अारक्षणासाठी माेर्चे काढण्यात येत अाहेत. गेल्या काही दिवसांपासून अारक्षणाची मागणी अधिक तीव्र हाेत अाहे. सकल मराठा समाजाकडून अारक्षणाची मागणी करण्यात येत अाहे. या मागणीला अाता पुण्यातील अडते-व्यापाऱ्यांनी पाठिंबा दर्शवला अाहे. अाज एकदिवसीय संप पुकारण्यात अाला असून मार्केटयार्डातील सर्व व्यवहार बंद ठेवण्यात अाले अाहेत. अारक्षण मिळाले नाही तर यापुढे 9 अाॅगस्ट क्रांंतीदिनापासून बेमुदत संपाचा इशारा कामगार युनियनचे सचिव संताेष नांगरे यांनी दिला अाहे. यावेळी कामगार युनियनचे शशिकांत नांगरे, नितीन जामगे, विलास थाेपटे, सुर्यकांत चिंचवले, दिपक जाधव, लाला शिंदे, तोलणार संघटनेचे राजेंद्र चोरघे व इतर पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
मार्केटयार्डातील सर्व व्यवहार अाज बंद असल्याने अडते-व्यापारी संघटनांनी पुकारलेला बंद 100 टक्के यशस्वी झाला असल्याचे संघटनांचे म्हणणे अाहे.