पहिल्या सत्रामध्ये अभिनेता संदीप पाठक यांनी नाट्य, कला व शिक्षण या विषयावर मार्गदर्शन केले, तसेच विद्यार्थी व शिक्षक यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे दिली. पहिल्या सत्राची सांगता अभिनेता संदीप पाठक यांनी वऱ्हाड निघालय लंडनला या एकपात्री नाटकाचे सादरीकरण करून केली. दुसऱ्या सत्रामध्ये अभिनेत्री व कथ्थक नृत्यांगना शर्वरी जमेनीस यांनी नृत्यकलेतून शिक्षण या विषयावर मार्गदर्शन केले. नृत्यामध्ये शरीर हालचाल, चेहऱ्यावरील हावभाव याचे अनन्यसाधारण महत्त्व असल्याचे त्यांनी आपल्या मार्गदर्शनात सांगितले, तसेच आपल्या शालेय जीवनातील काही अनुभव त्यांनी यावेळी विद्यार्थ्यांसमोर मांडले. कार्यशाळेची सांगता अभिनेत्री शर्वरी जमेनीस यांच्या श्रीगणेशवंदना या नृत्याने झाली. या कार्यशाळेला सभापती संजय गवारी यांनी शुभेच्छा दिल्या.
जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था पुणेच्या प्राचार्या डॉ. शोभा खंदारे म्हणाल्या की, विविध उपक्रम विद्यार्थ्यांसाठी राबवले जात आहेतच पण या कार्यशाळेच्या माध्यमातून विदयार्थ्यांना नवीन संधी उपलब्ध होतील. बाळकृष्ण वाटेकर यांनी मार्गदर्शन केले. कार्यशाळेचे प्रास्ताविक केंद्रप्रमुख साहेबराव शिंदे, तुषार शिंदे यांनी केले.