मखरे यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात असे म्हटले आहे की, खडकवासला पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता व कार्यकारी अभियंता हे नियमबाह्य पद्धतीने पाण्याची विक्री करतात. उन्हाळ्याच्या नियंत्रणाच्या काळात लाखो रुपये कमावतात, असा गंभीर आरोप मखरे यांनी केला आहे. पाटबंधारे खात्याचा पाणीवाटपाचा नियम टेल टू हेड असा असताना, ते हेड टू टेल असे पाणी वाटप करतात व पुन्हा टेल टू हेड पाणी वाटप करतात त्यामुळे गलांडवाडी नं २ च्या भिमाई पाणी वापर सहकारी संस्थेच कार्यक्षेत्रात येणाऱ्या शेतकऱ्यांना गेल्या १५ दिवसांपूर्वी पाणी मिळाले नाही. त्यामुळे गहू, हरभरा, ज्वारी, मका इत्यादी पिकांचे नुकसान झाले आहेत. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली आहे.
०५ इंदापूर पाणी
इंदापूर येथे लाक्षणिक धरणे आंदोलन करताना रत्नाकर मखरे व शेतकरी.