या वेबिनारसाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून जी. एस. कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय, (खामगाव, जि. बुलढाणा) येथील आयक्यूएसी समन्वयक डॉ. हेमंत चांडक यांनी संवाद साधला. आपल्या देशात अतिउत्तम प्रयोगशाळांची कमतरता असूनसुद्धा अनेक शास्त्रज्ञांनी खूप चांगले काम केले आहे. त्यांचा आदर्श समोर ठेवून संशोधनाचे काम केले पाहिजे. आजच्या काळात पेटंट दाखल करण्याचे भान ठेवणे गरजेचे आहे. त्याचा फायदा संशोधकांना होऊ शकतो, असे मत त्यांनी या वेळी बोलताना केले. या वेळी प्राचार्य डॉ. भरत शिंदे यांनीही मार्गदर्शन केले.
या वेळी डॉ. राजेश शर्मा यांनी प्रमुख अतिथींचा परिचय करून दिला. आयक्यूएसी समन्वयक प्रा. निलिमा पेंढारकर यांनी आभार मानले. डॉ. जयश्री बागवडे यांनी सूत्रसंचालन केले. या वेबिनारसाठी उपप्राचार्य डॉ. शामराव घाडगे आणि डॉ. लालासाहेब काशीद व सर्व प्राध्यापक उपस्थित होते.
————————————————