प्रशिक्षण कार्यशाळेसाठी मंचर परिसरातून १०० मुले व मुलींनी सहभाग घेतला. मूर्तिकार सचिन घोडेकर यांनी मूर्ती बनविण्याचे प्रशिक्षण दिले व सुप्रिया शिंदे यांनी मुलांना शाडूच्या मातीपासून बनविलेल्या गणपतीचे फायदे व पर्यावरणविषयी माहिती समजावून सांगितली.
या कार्यशाळेसाठी मुलांनी चांगला प्रतिसाद देऊन प्रशिक्षण घेतले. या कार्यक्रमासाठी ज्येष्ठ रोटेरियन इंजिनिअर बाळासाहेब पोखरकर, अविनाश ढोबळे, सचिन काजळे, सचिन चिखले, सागर काजळे, दीपक चौरे, राम मिंडे, आशिष पुंगलिया, तुषार कराळे, भूषण खेडकर, अजय घुले, प्रशांत बागल, जनार्दन मेंगडे, ॲड. बाळासाहेब पोखरकर, सचिन बांगर, दीपक भेके, आदी उपस्थित होते.
--
फोटो क्रमांक : १०मंचर गणपती कार्यशाळा
फोटोखाली : रोटरी क्लबच्या वतीने पर्यावरणपूरक शाडूच्या मातीपासून गणपती बनविण्याची एकदिवसीय कार्यशाळा पार पडली.