Video: "एकच वादा.. अजितदादा..." पुण्यात राष्ट्रवादीच्या वतीने अजित पवारांचे जंगी स्वागत
By ऑनलाइन लोकमत | Published: January 6, 2023 03:21 PM2023-01-06T15:21:30+5:302023-01-06T15:34:25+5:30
स्वराज्याच्या रक्षणासाठी लढणाऱ्या आमच्या वीर योद्धाला "स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज" याच नावाने संबोधणार,
पुणे : गाडगीळ वाडा, कलमाडी हाऊस प्रमाणेच पुण्यातील राजकीय घडामोडींचे एकेकाळचे केंद्र असलेले बारामती होस्टेल आज पुन्हा एकदा कार्यकर्त्यांच्या लगबगीने गजबजलेले पाहिला मिळाले. निमित्त होते विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी अनेक वर्षानंतर बारामती होस्टेलला दिलेली भेट.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी गुरुवारी जिल्ह्यातील पक्षाच्या नेत्यांची भेटी गाठी घेतल्या होत्या. त्यानंतर शुक्रवारी अजित पवार यांनी बारामती होस्टेलवर कार्यकर्त्यांच्या गाठी भेटी घेतल्या. त्यामुळे अनेक वर्षांनंतर बारामती होस्टेल गजबजले.
"एकच वादा.. अजितदादा..." ,"आम्ही कधीच राजकारण केले नाही धर्मांचे अन् जातीचे.., नेहमी हित पाहिले आहे महाराष्ट्राच्या मातीचे.." , स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराजांचा विजय असो “ अश्या प्रकारच्या घोषणांनी बारामती होस्टेलचा संपूर्ण परिसर दणाणून सोडला होता.
बारामती होस्टेलने आजवर अनेक स्थितंतरे पाहिली. काँग्रेसमधून शरद पवार यांची हकालपट्टी केल्यानंतर पवार हे आपल्या राज्यभरातील कार्यकर्त्यांना येथेच सामोरे गेले होते. दोन दिवस अगदी रात्री उशिरापर्यंत राज्यभरातून कार्यकर्ते येऊन पवार यांची भेट घेऊन आम्ही तुमच्याबरोबर असल्याची सांगत होते. पूर्वी शरद पवारही बारामती होस्टेलवर सकाळी ९ च्या ठोक्याला कार्यकर्ते, लोकांना भेटत असत. पुणे, पिंपरी तसेच जिल्ह्यांमधील निवडणुकांसंबंधीच्या बैठका येथेच होत असत. महापालिका निवडणुकीच्या तिकीटासाठी नेते येथेच अजित पवार यांची भेट घेत असत. येथेच अनेकांचे तिकीट फिक्स झाल्याचे नेत्यांना समजले होते. तर तिकीट न मिळाल्याने काही कार्यकर्त्यांनी येथे कुंड्या व इतर वस्तूंची आदळआपट करुन आपला रागही काही वर्षांपूर्वी व्यक्त केला होता. पण गेल्या काही वर्षांपासून शरद पवार आणि अजित पवार यांनी बारामती होस्टेलवर येणे कमी केले. त्यामुळे कार्यकर्तेही इकडे फिरकेनात. महादेवराव जानकर यांच्या राष्ट्रीय समाज पक्षाच्या कार्यकर्त्यांनी शरद पवार यांच्या प्रतिमेवर शाई फेक केल्याचा प्रकार ऑक्टोबर २०१६ घडला होता. त्यानंतर तब्बल साडेसहा वर्षांनी बारामती होस्टेलवर कार्यकर्त्यांची गर्दी झाली.
पुण्यात राष्ट्रवादीच्या वतीने अजित पवारांचे जंगी स्वागत #pune#AjitPawarpic.twitter.com/HvAP0kCytA
— Lokmat (@lokmat) January 6, 2023
स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज" याच नावाने संबोधणार
मी छत्रपती संभाजी महाराजांना कोणत्या एका धर्माच्या चौकटीत आणू इच्छित नाही. स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज हे शेवटच्या श्वासापर्यंत स्वराज्याच्या रक्षणासाठी लढत राहिले, सर्व जातीधर्मीय बांधवांच्या स्वराज्याच्या रक्षणासाठी लाढणाऱ्या आमच्या वीर योद्धाला "स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज" याच नावाने संबोधणार, अशी ठाम भूमिका अजित पवारांनी घेतली.