या प्रकरणी गणेश सुभाष शिंदे (वय २२, रा. रांजणगाव मशीद ता. पारनेर जि. अहमदनगर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
याबाबत वरिष्ठ पोलिस निरीक्षक पद्माकर घनवट यांनी दिलेल्या माहिती नुसार अमित मनोहर खराडे हे मोटरसायकल वरून नऊ महिन्यांपूर्वी दिवाळीची सुट्टी संपून पुण्याला जात असताना रांजणगाव गणपती मंदीराच्या जवळ पाठीमागून आलेल्या दोन पल्सर मोटारसायकलवकीस वरील अनोळखी तीन ते चार तरुणांनी त्यांना अडवून त्यांच्याशी भांडण काढून त्यांची मोटारसायकल, मोबाईल, रोख रक्कम, बॅंकेचे एटीएम व इतर कागदपत्र लंपास केले. त्यानंतर अमित खराडे यांनी पोलिसात फिर्याद दिली तेंव्हापासून पोलिस या चोरट्यांच्या शोधात होते. स्थानिक खबऱ्यांकडू मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांना असे गुन्हा करणारा एक आरोप सुपे-पारनेर रस्त्यावर येणार असल्याची माहिती पोलिसांनी मिळाली त्यावेळी पोलिसांनी सापळा रचून त्याला पकडले. या आरोपीवर नगर जिल्ह्यात आणखी गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांना मिळाली असून खराडे यांना लुटल्याची कबूलीही त्याने पोलिसांना दिली.
ही कामगिरी पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण डॉ. अभिनव देशमुख यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक पद्माकर घनवट,
सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन काळे, पोलिस हवालदार जनार्दन शेळके, राजू मोमीन, पोलिस नाईक अजित भुजबळ, मंगेश थिगळे यांनी केली.