या अभिनव योजनेसाठी शैलेंद्र आगरवाल, मुकेश आगरवाल, अतुल गुप्ता, अनंत पै, कीर्ती केळकर, यांनी पुढाकार घेतला आहे. रोटरी कमिटीचे अध्यक्ष नामदेव टेमघेर यांच्या पुढाकारातून काशीग येथे हा प्रकल्प राबविण्यात येणार आहे. महिला गट सदस्य अश्विनी टेमघरे, विमल शिंदे, मनीषा निंबळे, ज्योती मगर, पार्वताबाई टेमघरे व युवा गोपालक यांच्या सहकार्याने आत्तापर्यंत पंधरा गायींचे वाटप करण्यता आले.
रोटरी काशिग कामधेनू प्रकल्पाची अंमलबजावणीची सर्व जबाबदारी ही शिव विद्या प्रतिष्ठान या सामाजिक संस्थेकडे असून सर्वेक्षण, प्रशिक्षण, गृह व गोठा भेट, गायी बाजार भेट असे विविध टप्पे पार करत प्रकल्पाच्या माध्यमातून शेतकरी कुटुंबाला गायी दिल्या जातील असे प्रकल्प व्यस्थापक संतोष वंजारी यांनी सांगितले. याबाबत सल्लागार प्रमुख शिल्पा कशेळकर म्हणाल्या की, महिला सक्षमीकरण, लोकसहभाग व ग्रामविकास हे उद्दिष्ट्य डोळ्यासमोर ठेवून प्रकल्प बांधणी केली आहे. यावेळी संस्थेचे अध्यक्ष शिवप्रसाद कुलकर्णी, माजी सरपंच काशिनाथ शिंदे, प्रदीप बोंद्रे, धनंजय टेमघरे, साईदास शिंदे, योगेश टेमघरे, विश्वनाथ टेमघरे, अंकूश टेमघरे, सहादू टेमघरे उपस्थित होते.
--
फोटो क्रमांक : दिनेश यांच्या लॉगीनला २८न्यूज एक या नावाने डाक्युमेंटमध्ये फोटो आहे
फोटो ओळी : काशिग येथली गायी मिळालेल्या लाभार्थी महिला