कोरेगाव भीमा (पुणे) :पुणे-नगर महामार्गावर कोरेगाव भीमा (ता.शिरुर) येथे एस.टी. स्टँडसमोर भरधाव असणाऱ्या ट्रकने दुचाकीस्वारास उडविल्याने दुचाकीस्वारातील एकजण जागीच ठार झाला असून एकजण जखमी असून ट्रकचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत शिक्रापूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार व प्रशांत शिवाजी जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून प्रशांत जाधव व त्याचा मित्र निखिल जिवराम रावत हे दुचाकी क्र. के ए. ५१ एच एच ८२२६ हे दुपारी अहमदनगरकडे जात असताना कोरेगाव भीमा येथे दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास पाठीमागून येणाऱ्या ट्रक क्र. एम एच १२ के पी ४९९८ या वाहनाने धडक दिल्याने दोघे दुचाकीस्वार खाली पडले असूनही ट्रकचालकाने ट्रक तसाच पुढे नेत असताना ट्रक खाली निखिल रावत अडकला. दरम्यान, निखिल याच्या अंगावरून ट्रक पुढे गेल्याने जागीच मृत्यू झाला असून फिर्यादीही गंभीर जखमी झाला आहे. दरम्यान, ट्रकचालक प्रफुल्ल चंद्रकांत निकाळजे (रा. खेडकर मळा, उरुळी कांचन) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास सहाय्यक पोलीस निरिक्षक अविनाश थोरात हे करत आहेत.
दोन महिन्यांत १२ जणांचा मृत्यू
पुणे-नगर महामार्गाचे सहापदरी रस्त्याचे नूतनीकरणाचे काम सुरू असताना वाहनांच्या वेगामुळे गेल्या दोन महिन्यांत वाघोली ते शिक्रापूरदरम्यान गेल्या दोन महिन्यांत १२ जणांचा मृत्यू झाला आहे. रस्त्यावर वाहनांचे वेग प्रचंड वाढल्याने अनेक कुटुंबांचा आधार गेला असल्याने सार्वजनिक बांधकाम विभागापुढे रस्त्यावरील वाहनांचे वेग कमी करण्याचे आव्हान उभे ठाकले आहे.