या अपघातात अमोल रमेश लोखंडे(वय.२७ वर्षे)हे ठार झाले. आळेफाटा पोलीस स्टेशन कडुन मिळालेल्या माहितीनुसार दत्तात्रय भाऊसाहेब वैराळ राहणार नेवासा यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार अहमदनगर - कल्याण या महामार्गावर आणे घाटाच्या पहिल्या वळणावर गाडी नंबर (एम एच ४३ आर ६४२३) ही गाडी नगर बाजुकडुन आळेफाटा बाजुकडे येत होती.अमोल रमेश लोखंडे हे आपल्या जवळ असलेली चारचाकी वाहन घेऊन जात असताना ड्रायव्हर मनोज भाऊसाहेब शिंदे (वय३८वर्षे.रा. नेवासा बुद्रुक,ता.नेवासा) हे वेगाने घेऊन जात असताना वळणावर समोरील गाडीची लाईट पडल्याने कार टर्नन घेता हायवे रोड कडेला असलेले डोंगराचे दगडाला घासून पुढे जाऊन दगडाला अपघात झाला. अपघातात यामध्ये ड्रायव्हरच्या साईडला बसलेले कारचे मालक अमोल रमेश लोखंडे (वय२७ वर्ष रा.नेवासा,ता.नेवासा,जि.अहमदनगर) यांना डोक्याला गंभीर मार लागल्याने ते जागीच ठार झाले. एक जण जखमी झाला.
आणेघाटात अपघातात एक जण ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2021 4:09 AM