अंकुर रमेशचंद खंडेलवाल (३८ रा. कुमार प्रिमराज सोसायटी, खराडी) असे अपघातात मृत्यू पावलेल्या व्यक्तीचे नाव आहे. या प्रकरणी रोशनी अंकुर खंडेलवाल यांनी चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. ही घटना दि. ७ रोजी रात्री १२.१३ वाजता घडली. या प्रकरणी जोविनसन जेम्स (३०, रा. आकुर्डी) या कार चालकावर गुन्हा दाखल केला आहे. पोलीसांनी दिलेल्या माहीतीनुसार, कारचालकाने मद्यप्राशन केले होते. गंगा कॉन्स्टेल
सोसायटीच्या बाजूने वेगाने येत असताना चालकाचे कारवरील नियंत्रण निसटले. यात त्याने खंडेलवाल यांना जोराची धडक दिली. कारचा वेग इतका होता की, शेजारी असलेल्या कुमार प्रिमराज सोसायटीच्या संरक्षक भिंतीलाही जोराची धडक बसली. यात कार आणि भिंत यामध्ये खंडेलवाल यांना गंभीर दुखापत झाली. तसेच सोसायटीत असलेल्या एका गाडीचे नुकसान झाले. तात्काळ खंडेलवाल यांना खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र दुसऱ्या दिवशी त्यांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी कार चालकावर गुन्हा दाखल केला असून त्याला अटक करण्यात आल्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक सुनील जाधव यांनी