शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
2
“काँग्रेसचे कायम कुटुंबाला प्राधान्य, पण आमच्यासाठी राष्ट्र प्रथम”; CM मोहन यादव यांची टीका
3
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
4
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
5
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
6
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
7
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
8
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
9
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
10
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या
11
गोरगरीब धारावीकरांना पक्के घर मिळू नये हीच राहुल गांधींची इच्छा; भाजपाचा घणाघाती आरोप
12
याला म्हणतात पैशांचा पाऊस...! ₹4 चा शेअर 4 महिन्यांत ₹282631 वर पोहोचला, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
13
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
14
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
15
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
16
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
18
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
19
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार
20
हुश्श... उमेदवारांच्या कॉल, जाहिरातींनी मतदारांना भंडावून सोडलेले; अखेर प्रचार संपला, आता...

बावधनला वाहनाच्या धडकेत एकाचा मृत्यू, दोघे जखमी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 02, 2019 8:13 PM

भरधाव चारचाकीने दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात एकाचा मृत्यू झाला. तर, दोघेजण गंभीर जखमी झाले. रविवारी (दि. १) पहाटे बावधन येथे हा अपघात झाला. 

पिंपरी : भरधाव चारचाकीने दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात एकाचा मृत्यू झाला. तर, दोघेजण गंभीर जखमी झाले. रविवारी (दि. १) पहाटे बावधन येथे हा अपघात झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आकाश साळुंके (रा. खडकमाळ, पुणे) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर, महेश मधुकर काशीद आणि राम (पूर्ण नाव व पत्ता माहिती नाही) हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत. या प्रकरणी बंडू परशुराम काशीद (वय ४३, रा. खडकमाळ, पुणे) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार चारचाकी वाहनचालक रामदास सुखदेव चौगुले (वय २९, रा. थेरगाव) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

फिर्यादी बंडू काशीद यांचा पुतण्या आकाश हा महेश आणि राम या आपल्या मित्रांना दुचाकीवरून घेऊन जात होता. दरम्यान, ते बावधन येथील एका हॉटेल समोर आले असताना समोरून आलेल्या चारचाकी वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. यामध्ये आकाशच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. तर महेश आणि राम गंभीर जखमी झाले. हिंजवडी पोलीस तपास करत आहेत.

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यूbikeबाईक