सुषमा नेहरकर -शिंदे पुणे : सर्वसामान्य व अल्पभूधारक शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारावी, यासाठी केंद्रातील मोदी सरकारने प्रधानमंत्री किसान सन्मान योजना सुरू केली. या योजनेअतंर्गत प्रत्येक शेतकऱ्याच्या बँक खात्यात तीन टप्प्यांत ६ हजार रुपये जमा करणार आहेत. डिसेंबर २०१८मध्ये सुरू झालेल्या या योजनेअंतर्गत आतापर्यंत पुणे जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात २ लाख ४४ हजार शेतकऱ्यांच्या बँक खात्यात प्रत्येकी दोन हजार रुपये आणि दुसºया टप्प्यातील २ हजार रुपये १ लाख ९६ हजार शेतकरी आणि तिसऱ्या टप्प्यात केवळ १ लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यात दोन हजार रुपये जमा झाले आहेत. केंद्र शासनाच्या योजनेसाठी जिल्ह्यातील तब्बल ४ लाख शेतकरी पात्र असताना केवळ ५५-६० टक्केच शेतकऱ्यांच्या बँक खात्यात लाभाची रक्कम जमा झाली आहे. अद्यापही जिल्ह्यातील दीड-दोन लाख शेतकºयांना योजनेचा लाभ मिळालेला नाही.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या पहिल्या अर्थसंकल्पामध्ये अल्पभूधारक शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी प्रधानमंत्री किसान सन्मान योजना सुरू केली. या योजनेअतंर्गत सर्व पात्र लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात प्रत्येकी ६ हजार रुपये जमा करणार आहेत. हे पैसे संबंधित शेतकऱ्याला तीन टप्प्यांत दोन-दोन हजार रुपयांप्रमाणे जमा केले जाणार आहेत. या योजनेसाठी पुणे जिल्ह्यातील ४ लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांनी ऑनलाईन नोंदणी केली. त्यानंतर नोंदणी झालेल्यांपैकी २ लाख ४४ हजार शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पहिल्या हप्त्यापोटी प्रत्येकी २ हजार रुपये जमा केले. त्यानंतर ६ महिन्यांनंतर पुन्हा १ लाख ९६ हजार शेतकऱ्यांच्या बँक खात्यात दुसऱ्या हप्त्याचे २ हजार रुपये जमा झाले. परंतु, दरम्यानच्या काळात योजनेमध्ये काही त्रुटी असल्याचे व चुकीच्या व्यक्तीदेखील लाभ घेत असल्याचे शासनाच्या निदर्शनास आले. यामुळे ज्या शेतकºयांचे बँक खाते आधार लिंक असेल त्यांना योजनेचा लाभ देण्याचा निर्णय घेतला. जिल्ह्यात ४ लाख पात्र लाभार्थ्यांपैकी तब्बल १ लाख ३५ हजार शेतकºयांचे बँक खाते आधार लिंक नसल्याचे स्पष्ट झाले आहे. यामध्ये अद्याप काही शेतकºयांनी आधार नोंदणी केली नाही, काहींचा आधार क्रमांक चुकला आहे, आधारचे नाव आणि सात-बाºयावरील नाव यांचा मेळ बसत नाही. या सर्व त्रुटींमुळे जिल्ह्यातील लाखो शेतकºयांना दुसºया आणि तिसºया हप्त्याचे पैसे अद्याप मिळालेले नसल्याचे जिल्हा प्रशासनाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे. ........
बँक खाते आधार लिंक करण्यासाठी खास शिबिरपुणे जिल्ह्यात प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेसाठी ४ लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. यांपैकी पहिल्या टप्प्यात सुमारे अडीच लाख शेतकऱ्यांना प्रत्येकी २ हजार रुपयांचा लाभ मिळाला आहे; परंतु त्यानंतर ज्या शेतकऱ्यांचे बँक खाते आधार लिंक असेल त्यांनाच योजनेचा लाभ देण्याचे निश्चित करण्यात आले. पण, अद्यापही जिल्ह्यातील १ लाख ३५ हजार शेतकºयांचे बँक खाते आधार लिंक झालेले नाही. यासाठी जिल्हा प्रशासन व सर्व संबंधित बँकांच्या मदतीने खास शिबिर घेऊन शंभर टक्के शेतकऱ्यांचे बँक खाते आधार लिंक करण्याचा प्रयत्न सुरू आहे.- डॉ. जयश्री कटारे, निवासी उपजिल्हाधिकारी.........प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेची जिल्ह्यातील स्थिती* जिल्ह्यात एकूण पात्र व नोंदणी केलेले शेतकरी : ४ लाख* पहिल्या टप्प्यात २ हजार रुपये जमा झालेले शेतकरी : २ लाख ४४ हजार* दुसऱ्या टप्प्यात २ हजार जमा झालेले शेतकरी : १ लाख ९६ हजार* तिसऱ्या टप्प्यात २ हजार जमा झालेले शेतकरी : १ लाख