बारामती - बारामती तालुक्यात काटेवाडी, कण्हेरी परिसरात धुमाकूळ घालणाऱ्या बिबट्या अखेर वन खात्याने लावलेल्या पिंजऱ्यात जेरबंद झाला आहे .मात्र बिबट्यांची संख्या एकापेक्षा अधिक असल्याने दहशतीचे वातावरण कायम आहे.
बारामती तालुक्यातील कण्हेरी येथील संतोष जाधव या शेतकऱ्याच्या शेतात लावलेल्या पिंजऱ्यामध्ये आज बिबट्या जेरबंद झाला. या बिबट्याला मोठ्या पोलिस बंदोबस्तात बारामती येथे हलविण्यात आले आहे. गेल्या दहा दिवसांपासून बिबट्याने तालुक्यातील काटेवाडी , कण्हेरी, ढेकळवाडी तसेच इंदापूर तालुक्यातील लकडी येथे शेळ्या मेंढ्यांची शिकार केली होती .त्याने आतपर्यंत सहा शेळ्या , मेंढी , कुत्र्याची शिकार केली आहे .
दरम्यान , बिबट्याला बारामती एमआयडीसीतील वन विभागाच्या कार्यालयाच्या आवारात नेण्यात आले आहे .त्याला पाहण्यासाठी संपूर्ण काटेवाडी गाव लोटले होते .