शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही मंगळावर जा, तेथे ना EC आहे ना EVM...!"; संबित पात्रा यांनी कुणाची खिल्ली उडवली?
2
94 वर्षांच्या उद्योगपतीनं दान केले ₹10000Cr...; सांगितलं, मृत्यूनंतर अब्जावधीच्या संपत्तीच काय होणार? कोण असणार उत्तराधिकारी?
3
"अनेक राजे-महाराजे आले आणि गेले, पण…"; अजमेर शरीफसंदर्भात कोर्टाची नोटीस, PM मोदींवर भडकले ओवेसी
4
"सच्चा शिवसैनिक..., आज मोठा गैरसमज त्यांनी दूर करून टाकला"; केसरकर यांच्याकडून CM शिंदेंचं मुक्त कंठानं कौतुक
5
एकनाथ शिंदेंची स्पष्ट भूमिका, भाजपाचा CM होण्याचा मार्ग मोकळा; फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
6
हिवाळी अधिवेशनात गदारोळ: अदानी समूहाच्या मुद्द्यावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी
7
₹35 चा शेअर खरेदी करण्यासाठी गुंतवणूकदारांची झुंबड, दुसऱ्या दिवशीही लागलं अप्पर सर्किट
8
ISRO ने हाती घेतली नवीन मोहिम; भारताचे यान थेट शुक्र ग्रहावर जाणार, सर्व गुपिते उघड होणार...
9
अजमेर दर्ग्यात शिव मंदिर? न्यायालयानं याचिका स्वीकारली, सर्व पक्षकारांना नोटीस पाठवली!
10
IND vs AUS : Rohit Sharma ला दुसऱ्या कसोटीत मोठी संधी, Virat Kohli शी साधणार बरोबरी? पाहा खास आकडेवारी
11
हिवाळी अधिवेशनात वक्फ दुरुस्ती विधेयक मांडले जाणार नाही; कारण काय? जाणून घ्या...
12
विजय शंकरचा जबरदस्त थ्रो! हार्दिक पांड्याच्या तुफानी खेळीला लागला ब्रेक, पण... (VIDEO)
13
IPL मध्ये लागली ३० लाखांची बोली अन् पुढच्याच सामन्यात Arjun Tendulkar ने केली खराब कामगिरी, संघाच्याही पराभवाची हॅटट्रिक
14
३० तारखेपर्यंत शपथविधी व्हायला हवा, अडीच वर्षांपूर्वीची परिस्थिती वेगळी, आताची वेगळी; अजित पवारांचे मुख्यमंत्रीपदावर वक्तव्य
15
काँग्रेसचे ठरले! ‘मतपत्रिकेवर निवडणुकी’साठी ‘भारत जोडो’सारखी राहुल गांधींची देशव्यापी यात्रा
16
नव्या सरकारमध्ये तुमचे स्थान काय असेल? उपमुख्यमंत्री की गृहमंत्री? एकनाथ शिंदेंचे सूचक विधान
17
बागेश्वर बाबासमोर 'द ग्रेट खली'नं साधूला केसाने पकडून एका हातात उचलले, व्हिडिओ व्हायरल...
18
'मिटकरींनी पक्षाचे आमदार असूनही पक्षविरोधी भूमिका घेतली...'; पार्थ पवारांचे धक्कादायक ट्विट
19
“मी मोदींना फोन केला, म्हटलं माझा कुठलाही अडसर नसेल!”; एकनाथ शिंदेंनी CM पदावरचा दावा सोडला
20
भरघोस पगार वाढ! IPL मध्ये या चौघांना मिळालं कोहलीपेक्षाही तगडं पॅकेज

दगडाने डोके ठेचून एकाची हत्या

By admin | Published: May 12, 2017 4:56 AM

येथे राहात असलेल्या वारकरी संप्रदायातील बालाजी इभूते (वय ४०) यांची अज्ञात हल्लेखोरांनी दगडाने तोंड व डोके ठेचून हत्या केली.

लोकमत न्यूज नेटवर्कशिक्रापूर : येथे राहात असलेल्या वारकरी संप्रदायातील बालाजी इभूते (वय ४०) यांची अज्ञात हल्लेखोरांनी दगडाने तोंड व डोके ठेचून हत्या केली. ही घटना शुक्रवारी पहाटे घडली.इभूते हे मूळचे कर्नाटक येथील रहिवासी असून, ते अनेक वर्षांपासून शिक्रापूर येथे राहात आहेत. सणसवाडी येथील एका खासगी कंपनीत ते नोकरी करत आहेत. गुरुवारी रात्री बाराच्या सुमारास चौकातून जाऊन येतो असे पत्नीला सांगून ते बाहेर गेले परंतु ते घरी आले नाहीत. त्यानंतर पत्नीने त्यांना मोबाईलवर फोन केला असता दहा मिनटांत येतो असे सांगितले. परंतु बालाजी इभूते आलेच नाहीत म्हणून त्यांच्या पत्नीने रात्री अडीचच्या सुमारास राजू अंकुशे व शेजारील आशिष यांना इभूते यांना पाहण्यासाठी चौकात पाठविले. यांनतर हे दोघे चौकात जात असताना घरापासून काही अंतरावर असलेल्या एसटी स्थानकाशेजारील रस्त्यावर बालाजी जखमी अवस्थेत पडलेले दिसून आले. या वेळी येथून पन्नास फूट अंतरावर त्यांची दुचाकी पडलेली दिसून आली. यानंतर तातडीने शिक्रापूर येथील रुग्णालयात उपचारासाठी त्यांना दाखल केले. या वेळी बालाजी इभूते यांच्या डोक्याला, कानाला गंभीर मार लागला होता. त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे तेथील डॉक्टरांनी सांगितले. यांनतर त्यांना पुढील उपचारासाठी पुणे येथे घेऊन जात असताना रस्त्यात बालाजी यांचा मृत्यू झाला. शिक्रापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रमेश गलांडे, सहायक पोलीस निरीक्षक अतुल भोसले आदी घटनास्थळी आले.