माहिती अधिकारांतर्गत अर्ज आल्यानंतर त्याला उत्तर देण्याबाबत टाळाटाळ करण्याचा प्रयत्न केला जातो. अर्जदार फारफार तर दुसर्या अपिलापर्यंत जाईल. तिथे दोन-दोन वष्रे अपील सुनावणीला येत नाही. तसेच सुनावणी झाल्यानंतरही माहिती न दिल्याबद्दल दंड होण्याचे प्रमाण अगदी नगण्य आहे. माहिती अधिकारासंदर्भात अधिकार्यांना खरंच माहिती नसेल तर आम्ही मोफत प्रशिक्षण द्यायला तयार आहोत. मात्र, माहिती देण्यात केली जाणारी टाळाटाळ अक्षम्य आहे.- विवेक वेलणकर, सजग नागरिक मंच एनडी स्क्वॉडच कार्यरत नाहीएनडी स्क्वॉडच्या समन्वयाची जबाबदारी असणार्या सुरक्षा विभागाने सर्वात धक्कादायक उत्तर देऊन माहिती देण्याचा प्रश्नच निकालात काढला आहे. पालिकेने १९९९ मध्ये एनडी स्क्वॉडची स्थापना केली होती, मात्र २00७ पासून ते बंद करण्यात आले आहे, असे सांगून त्यांनी उत्तरअर्जच बाद केला. केवळ २0१२ मध्ये या पथकाच्या स्वरूपात किरकोळ बदल झाल्याने त्याचे नाव बदलण्यात आले. त्या आधारे त्यांनी हे उत्तर दिल्याचे सुरक्षा विभागाकडून सांगण्यात आले. दीपक जाधव■ पुणेमाहिती अधिकारांतर्गत विचारलेल्या प्रश्नाला प्रशासकीय अधिकारी कसा प्रतिसाद देतात, याचे एक उत्तम प्रातिनिधिक उदाहरण पुणे महापालिकेत पाहायला मिळाले. शहरातील १५ क्षेत्रीय कार्यालयांना बहुउद्देशीय कारवाई पथकाबाबत ५ प्रश्न विचारले. त्यास १२ कार्यालयांनी वेगवेगळी उत्तरे देऊन माहिती देण्याचे टाळले, तर तीन कार्यालयांनी मात्र व्यवस्थित माहिती दिली आहे.महापालिकेतर्फे पाण्याची चोरी रोखणे, अतिक्रमण कारवाई, रस्त्यावर राडारोडा टाकणे, थुंकणे, कचरा टाकणे, शौच करणे, अडगळ टाकणे आदी प्रकार करणार्यांविरुद्ध बहुउद्देशीय कारवाई पथक स्थापन केले आहे. एनडी स्क्वॉड या नावाने हे पथक शहरात ओळखले जाते. माहिती अधिकार कार्यकर्ते अजहर खान यांनी या पथकाबाबत क्षेत्रीय कार्यालयांकडे माहिती मागितली होती.एनडी स्क्वॉडच्या कारवाईचे निकष काय आहेत, असा प्रश्न त्यांनी विचारला होता. विङ्म्रामबागवाडा कार्यालयाने हा प्रश्न सुरक्षा अधिकार्यांशी संबंधित असून त्यांच्याकडून माहिती घ्या, असे सांगितले. आपण ४0 महिन्यांची माहिती विचारली असून, त्याची एकूण ४0 प्रतींमध्ये माहिती देणे असल्याने प्रतिपानास २ रुपये याप्रमाणे पैसे कार्यालयात जमा करावे, मग माहिती देण्यात येईल, असे ढोले-पाटील रोड कार्यालयाकडून सांगण्यात आले.कोंढवा कार्यालयाने ही बाब आरोग्य खात्याशी संबंधित असल्याने त्यांच्याकडून माहिती घ्या, असे सांगितले आहे. एनडी स्क्वॉडची स्थापना कधी झाली, याकरिता विङ्म्रामबागवाड्याने सुरक्षा विभागाशी, कोंढवा कार्यालयाने आरोग्य विभागाशी तर बिबवेवाडी कार्यालयाने मनपा कार्यालयाशी संपर्क साधण्यास सांगितले आहे.कारवाई काय केली, याबाबत विङ्म्रामबाग वाडा कार्यालयाने कार्यालयीन वेळेत कागदपत्रे पाहण्यास मिळतील, असे सांगितले. नगर रोड, धनकवडी, कोंढवा, कोथरूड, वारजे, येरवडा या कार्यालयांनी कारवाईची आकडेवारी दिली आहे.
माहिती अधिकाराचा प्रश्न एक, उत्तरे अनेक!
By admin | Published: June 16, 2014 7:57 AM