पुणे : बीअारटी मार्गात खाजगी वाहनांची घुसखाेरी अाता नित्याचीच झाली अाहे. पीएमपी किंवा पाेलीसांकडून फारशी कारवाई हाेत नसल्याने वाहनचालक बिंधास्त या मार्गातून अापली वाहने नेत असतात. अशातच संगमवाडीकडून सादलबाबा चाैकात येताना सिग्नलला माेठ्याप्रमाणावर वाहतूक काेंडी हाेत असते. त्यामुळे अनेक दुचाकीचालक पदपथावरुन वाहने घेऊन जात असतात. अाज दुपारच्या सुमारास या पदपथांवरुन येणाऱ्या वाहनचालकांवर चाैकातील वाहतूक पाेलीसंकडून कारवाई करण्यात येत हाेती. परंतु त्यांच्या समाेरच बीअारटी मार्गातून येणाऱ्या वाहनचालकांवर पाेलीस कारवाई करीत नव्हते. त्यामुळे एकीकडे कारवाई तर दुसरीकडे डाेळेझाक असाच प्रकार वाहतूक पाेलीसांकडून सुरु असल्याचे दिसून अाले.
उपनगरातील नाागरिकांना लवकरत शहरात पाेहचता यावे. त्याचबराेबर खाजगी वाहनांची संख्या कमी व्हावी यासाठी खरंतर बीअारटी मार्ग शहरातील विविध मार्गांवर सुरु करण्यात अाले हाेते. सद्यस्थितीला यातील एकही मार्ग याेग्यरित्या चालत नसल्याचे दिसून येत अाहे. बीअारटी बसेससाठी तयार करण्यात अालेल्या मार्गात खासगी वाहनांची घुसखाेरी हाेत असते. या घुसखाेरीमुळे अनेक प्राणांतिक अपघातही या मार्गात झाले अाहेत. या मार्गात घुसखाेरी करणाऱ्या वाहनांवर वाहतूक पाेलीसांकडून कारवाई हाेत नसल्याने अाअाे जाअाे घर तुम्हारा अशीच काहीशी परिस्थीती निर्माण झाली अाहे. तसेच बीअारटी मार्गाचा मूळ हेतूच बारगळून पडला अाहे. त्यातच चाैकात उभ्या असणाऱ्या वाहतूक पाेलीसांकडून पदपथांवरुन येणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई केली जात असताना बीअारटी मार्गातून येणाऱ्या वाहनचालकांना माेकळे साेडण्यात येत असल्याचे अाज दुपारी दिसून अाले.
बीअारटी मार्गातून येणारे वाहनचालक पाेलीसांच्या समाेर सिग्नलला थांबत असताना पाेलीस त्यांच्याकडे डाेळेझाक करीत हाेते. पदपथांवरुन येणाऱ्याला वेगळा नियम तर बीअारटी मार्गातून येणाऱ्यांना वेगळा नियम पाेलीसांकडून लावला जात हाेता. त्यामुळे बीअारटी मार्गात घुसखाेरी करणाऱ्या वाहनचालकांवर सुद्धा वाहतूक पाेलीस कारवाई करणार का असा प्रश्न नागरिक विचारत अाहेत.