पुणे : जन्मत:च हदयाला छिद्र असल्यानं त्याचं ऑपरेशन करणं गरजेचं होतं. मात्र ऑपरेशन पूर्व चाचणीत अनेक संकटे आली. त्याची दृष्टी गेली...शरीराची डावी बाजू पूर्ण निकामी झाली. आईवडिलांनी हातात ’जिगसॉ पझल’ दिलं...आणि ते सोडवण्याचा त्याला छंद जडला. आश्चर्य वाटेल, पण त्याच्या याच छंदाची नोंद ‘लिम्का बुक ऑफ रेकॉर्डस’ मध्ये झाली आहे. या छंदानं त्याच्या आयुष्याला दिशाचं नव्हे तर बळ दिलं आहे. कर्वेनगर येथे राहाणा-या सिद्धार्थ भूषण जोशी असे या तरूणाचे नाव आहे. विखुरलेल्या,वेड्या वाकड्या आकाराच्या आणि रंगांच्या तुकड्यांना अत्यंत शांतपणे आणि चिकाटीने जोडत तो चित्र बनवत जातो.लहानपणी खेळण्याच्या दुकानात मिळणारी बारा,पंधरा, चोवीस,तीस,साठ, एकशेविस, दोनशे,तीनशे आणि पाचशे तुकड्यांची असंख्य जिगसॉ पझल त्याने सोडवली पण आता त्या तुकड्यांची संख्या तीन हजारांपर्यंत गेली आहे.आज सुस्थितीत आणि छान फ्रेम करून ठेवलेली दोनशे ते अडीचशे पझल्स त्याच्याकडे पहायला मिळतात.पझल्स पाहून ती पेंटिंग्ज असावीत असा भास होतो. त्याच्या या छंदाची नोंद ‘लिम्का बुक ऑफ रेकॉर्डस’ ने घेतली आणि फेब्रुवारी २०१९ ला सर्टिफिकेट देऊन त्यावर शिक्कामोर्तब झाले. आपल्या मुलाच्या या शारीरिक अवस्थेविषयी हार न मानता त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिलो. शरीरावर झालेल्या अनेक दुष्परिणामात चंचलता हा मोठा अडथळा होता.चंचलता कमी व्हावी म्हणून अनेक युक्त्या शोधल्या.जिगसॉ पझल सोडवायला देणे हाही एक उपायच होता.पण तो जमला, त्याला आवडू लागला.खेळाचं रुपांतर थेरपीत आणि थेरपीचं छंदात झालं...असे त्याची आई स्मिता जोशी अभिमानाने सांगतात.----------------------------------------------------------त्याच्या जिददीचा लढा झाला शब्दबद्धआपल्या मुलाची जिदद आणि कुटुंबाने दिलेला लढा आई स्मिता जोशी हिने पुस्तकरूपात शब्दबद्ध केला आहे. पुढील आठवड्यात राजहंस प्रकाशनतर्फे हे पुस्तक प्रकाशित होणार आहे.
" हा " छंद जीवाला लावी पिसे....
By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2019 12:37 PM
या छंदानं त्याच्या आयुष्याला दिशाचं नव्हे तर बळ दिलं आहे.
ठळक मुद्देया छंदाची नोंद ‘लिम्का बुक ऑफ रेकॉर्डस’ ने घेतली