शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

PMRDA: पीएमआरडीए पदभरतीला लागणार वर्षभराचा कालावधी

By नारायण बडगुजर | Published: January 04, 2024 12:01 PM

पीएमआरडीएच्या आस्थापनेवर तसेच करार पद्धतीने आणि प्रतिनियुक्तीने अधिकारी व कर्मचारी कार्यरत आहेत...

पिंपरी : कंत्राटी मनुष्यबळावर कामकाज सुरू असलेल्या पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (पीएमआरडीए) करण्यात येणाऱ्या पदभरती प्रक्रियेला वर्षभराचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. पीएमआरडीएमध्ये ४०७ पदांचा आकृतीबंध मंजूर झाला आहे. पीएमआरडीएच्या आस्थापनेवर तसेच करार पद्धतीने आणि प्रतिनियुक्तीने अधिकारी व कर्मचारी कार्यरत आहेत.

राज्य सरकारच्या नगरविकास विभागाकडून ३१ मार्च २०१५ रोजी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अर्थात पीएमआरडीएची स्थापना झाली. तेव्हापासून पीएमआरडीएमार्फत आकृतीबंध व सेवाप्रवेश नियम तयार करण्याचे काम सुरू होते. आकृतीबंध तयार करून शासनाकडे पाठविल्यानंतर जानेवारी २०२३ मध्ये शासनाच्या प्राधिकरण कार्यकारी समितीकडून त्यास मान्यता मिळाली. त्यानंतर राज्य शासनाने आकृतीबंध मंजूर केला.

प्रतिनियुक्तीवरील मोजके अधिकारी वगळले तर पीएमआरडीएचा संपूर्ण कारभार सात वर्षे कंत्राटी मनुष्यबळावर विसंबून होता. मात्र, गेल्या वर्षी पीमआरडीएचा ५७ संवर्गाचा आणि एकूण ४०७ पदसंख्येचा हा आकृतीबंध मंजूर झाला. यापैकी काही पदे सरळ सेवेने, तर उर्वरित पदोन्नतीने व प्रतिनियुक्तीने भरली जातील. आकृतीबंध मंजूर झाल्यानंतर आता याबाबत सेवा प्रवेश बनविण्याची कार्यवाही करण्यात येत आहे. हे सेवा प्रवेश राज्य सरकारला सादर करून त्यासाठी मंजुरी घेतली जाणार आहे. राज्य सरकारची मंजुरी मिळाल्यानंतर पीएमआरडीएला सरळसेवा आणि प्रतिनियुक्तीने आवश्‍यक पदे भरता येणार आहेत. पीएमआरडीएमध्ये सध्या प्रतिनियुक्तीवर गट अ - ३५, गट ब - २१ आणि गट क - १६ जागांवर अधिकारी, कर्मचारी नियुक्त केलेले आहेत.

कामकाजात होणार सुधारणा

पुणे शहर, पिंपरी-चिंचवड शहरासह ग्रामीण भागातील १० तालुक्यांमधील ८१७ गावांचा एकूण ७ हजार २५६ चौरस किलोमीटर परिसर पीएमआरडीएमध्ये समाविष्ट आहे. पीएमआरडीए हद्दीत मोठा औद्योगिक पट्टा असल्याने नागरिकरण वाढत आहे. यासह मेट्रो, रिंगरोडसारखे प्रकल्प पीएमआरडीएने हाती घेतले आहेत. या प्रकल्पांसह नियमित कामकाज अधिक नियोजनबद्धपणे होण्यास मदत होणार आहे. मंजूर आकृतीबंधानुसार संवर्ग व पदसंख्या

वर्ग - संवर्ग संख्या - पद संख्याअ - २५ - ८२ब - १३ - ९६क - १७ - १७९ड - २ - ५०एकूण - ५७ - ४०७

सेवा प्रवेश नियम शासनास सादर केले आहेत. त्यास मान्यता प्राप्त झाल्यानंतर बिंदूनामावली तयार करून मागासवर्ग कक्षाची मान्यता घ्यावी लागेल. पदभरतीसाठी कंपनी नियुक्ती करून जाहिरात व सर्व पदभरती याला किमान एक वर्ष इतका कालावधी लागेल.

- सुनील पांढरे, सहआयुक्त, पीएमआरडीए

टॅग्स :PMRDAपीएमआरडीएPuneपुणे