पुणे : कायद्यानुसार गर्भलिंग निदान करण्यास प्रतिबंध असताना या कायद्याचे उल्लंघन करणारे हडपसर येथील डॉ. शशिकांत ठकसेन पोटे व डॉ. सुयोग सुभाष थेपडे यांना एक वर्षांची कैद आणि प्रत्येकी ३५ ते ४० हजार रुपयांचा दंडाची शिक्षा सुनावण्यात आली.डॉ. पोटे यांचे हडपसर येथे चेतन सोनोग्राफी सेंटर आहे. तर हडपसर येथील मंत्री मार्केटसमोर थेपडे सोनोग्राफी सेंटर नावाने डॉ. थेपडे हे सेंटर चालवतात.महापालिकेच्या आरोग्य अधिकारी डॉ. वैशाली जाधव यांनी आपले सहकारी अधिकारी महेंद्र जगताप यांच्यासह २ जून २०११ मध्ये तपासणी केली. यामध्ये गर्भधारणापूर्व व प्रसवपूर्व निदान तंत्र (लिंग निवडीस प्रतिबंध) अधिनयम १९९४ तरतूदीनुसार गर्भलिंग निदान करण्यास प्रतिबंध असताना येथे गर्भलिंग निदान करण्यात येत असल्याचे निदर्शनास आले. फॉर्म ‘एम’ व इतर कागदपत्रांची पूर्तता करणे बंधनकारक असताना या कागदपत्रांमध्ये त्रुटी आढळून आल्या. त्यानुसार खटला दाखल करण्यात आला होता.
गर्भलिंग निदान करणा-या डॉक्टरांना एक वर्षाची कैद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2017 3:01 AM