हडपसर : हडपसर येथील गाडीतळ पुलाखालून दोन दिवसांपूर्वी आईजवळ झोपलेल्या एक वर्षाच्या चिमुरड्याचे दोन महिलांनी अपहरण केल्यानंतर आज पहाटे तो चिमुरडा पुन्हा आईच्या कुशीत परत आला. परत सोडणाऱ्या त्या 3 आरोपीना पोलिसांनी अटक केली आहे
या प्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात शर्मिला निलेश काळे या महिलेने फिर्याद दिली होती. तिचा मुलगा कार्तिक (वय 1वर्ष ) याला पळवून नेले. त्यानुसार दोन महिलांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. मुल होत नसल्याने मुल पळवून आणण्याचे ठरवून मुल नेले . मात्र पोलीस मागावर असल्याने भीती पोटी ते मुल आज सकाळी आई जवळ सोडून दिले .
या प्रकरणी पंचशीला तिपण्णा मेलिंकेरी (वय 33), वैशाली तुळशीराम सोनकांबळे (वय 41),केरनाथ नागनाथ सूर्यवंशी (वय 33) सर्व रा.चौफुला ता .दौंड , मुळगाव शिरपूर ता .बसवकल्याण जि. बिदर कर्नाटक यांना अटक केली आहे .
पतीसोबत वाद झाल्यामुळे फिर्यादी शर्मिला नीलेश काळे या हडपसर येथील गाडीतळ पुलाखाली काही ओळखीच्या महिलांसोबत राहत होती. ती रविवारी रात्री येथे आली होती. मात्र, सोमवारी पहाटेच्या सुमारास त्या गाढ झोपेत असताना दोन महिला चालत त्या ठिकाणी आल्या. त्यांनी फिर्यादी यांच्याजवळ झोपलेल्या त्यांच्या एक वर्षाच्या मुलाला उचलून घेऊन गेल्या.पंचशीलाला मुल होत नसल्याने बहीण वैशाली व भावजी केरनाथ यांचे सोबत चर्चा करून मुल पळवून आणण्याचे ठरवले होते अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण कदम यांनी दिली .
हा सर्व प्रकार उघडकीस आल्यानंतर हडपसर पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल करत या मुलाचा शोध सुरू केला होता. अपहरणाचा हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैदही झाला होता. पोलीस शोध घेत असताना आज पहाटे अज्ञातांनी त्या चिमुकल्याला पुन्हा या ठिकाणी आणून सोडले होते.