पुणे : सांगली, कोल्हापूर जिल्ह्यात आलेल्या पूराचा प्रचंड मोठा फटका शेती मालाला बसला असला आहे. परिणामी कांद्याचे दर एका आठवड्यात किलोमागे तब्बल २० ते २४ रुपयांनी वाढले आहेत. आठ दिवसांपूर्वी पुण्यातील गुलटेकडी मार्केट यार्डात १४ ते १६ रुपये किलो दराने कांदा मिळत होता. यामध्ये वाढ होऊन आता कांद्याचे दर ३४ ते ४० रुपये किलोपर्यंत वाढले आहे. भविष्यात यामध्ये अधिक वाढ होण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी केली. जुलै महिन्यात सांगली, कोल्हापूरसह, पुणे, नगर आणि नाशिक या कांदा उत्पादक जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झाला. अतिवृष्टीमुळे या भागातील कांदा उत्पादनावर मोठा परिणाम झाला आहे. पुण्याच्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये प्रामुख्याने पुणे, नगर, सांगली, सातारा, कोल्हापूर आणि सोलापूर या भागातून कांदा विक्रीसाठी बाजारात येतो. परंतु अतिवृष्टीमुळे ही आवक मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे. सध्या दररोज मार्केट यार्डमध्ये ८० ते १०० ट्रक कांदा विक्रीसाठी येत आहे. घाऊक बाजारात दहा किलो कांद्यास १८० ते २२० रुपये दर मिळत आहे. मागील आठवड्यात हाच दर १४० ते १६० रूपयांवर होता. राज्यातील पूरस्थिती पूर्वपदावर आल्यानंतर कांद्याची आवक हळूहळू स्थिर होऊ लागली आहे. परंतु यंदा कांद्याचे दर तेजीत राहण्याची शक्यता कांद्याचे व्यापारी राजेंद्र कोरपे यांनी दिली.
सांगली, कोल्हापूरच्या पूराचा फटका; कांदा ४० रुपये किलो
By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2019 7:43 PM
आठ दिवसांपूर्वी पुण्यातील गुलटेकडी मार्केटयार्डात १४ ते १६ रुपये किलो दराने कांदा मिळत होता.
ठळक मुद्देआठ दिवसांत किलोमागे २० रुपयांची वाढसध्या दररोज मार्केट यार्डमध्ये ८० ते १०० ट्रक कांदा विक्रीसाठी