शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदानाच्या एक दिवस आधीच ठाकरे गटाला धक्का; डोंबिवलीतील नाराजीचा शिंदे गटाला फायदा
2
Maharashtra Election 2024: ‘या’ मतदारसंघांमध्ये विद्यमान आमदार लढवत नाहीये निवडणूक! काय आहेत कारणे?
3
सत्ताधारी सत्तेसाठी खालच्या थराला जात आहेत; देशमुखांवरील हल्ल्यानंतर शरद पवारांचा संताप
4
"...अन्यथा माझा बाबा सिद्दिकी व्हायला वेळ लागणार नाही", शरद पवार गटाच्या रमेश कदमांना जीवे मारण्याची धमकी 
5
नीरव मोदी-विजय माल्ल्यावर कारवाई होणार! PM मोदींनी ब्रिटनसमोर उपस्थित केला मुद्दा
6
ऐन निवडणुकीत पक्षाकडून निलंबन; सांगता सभेत शरद पवारांबद्दल काय म्हणाले राहुल जगताप?
7
"...तर उद्धव ठाकरे यांच्यावर FIR का दाखल होत नाही? त्यांना आत का टाकत नाही?"; रामदास कदम यांचा सवाल
8
मराठी-हिंदी गाणी गाणाऱ्या प्रसिद्ध गायकाने गमावलेला आवाज, २ वर्षांनी केला खुलासा
9
या सगळ्या अफवा! असित मोदींसोबतच्या भांडणावर जेठालालचं स्पष्टीकरण, म्हणाले- "मी हा शो सोडत नाहीये..."
10
कश्मिरा शाहचा अपघात नक्की कसा झाला? नणंद आरती सिंहने दिली माहिती; म्हणाली, "मॉलमध्ये..."
11
Mohammed Shami च्या फिटनेस टेस्टसाठी BCCI नं सेट केला नवा पेपर
12
'हे' ७ फॉर्म्युले डोक्यात फिट करा, कमाईसोबतच तुमचा पैसाही वाढेल; लोकही विचारतील, "हे कसं केलं?"
13
मोदी-ठाकरे-पवार-शिंदेंनी मैदान गाजवलं; सोलापुरात कुठे कोणत्या नेत्याच्या सभा झाल्या? जाणून घ्या
14
27000 सैनिक तैनात, अनेक जिल्ह्यात कर्फ्यू, इंटरनेट बंद; मणिपूरमध्ये नेमकं काय घडतंय?
15
भयानक! समुद्रकिनारी बसलेल्या माय-लेकी, अचानक लाट आली अन्...; थरकाप उडवणारा Video
16
विशेष मुलाखत: "संविधानाचे संरक्षण व्हावे यासाठीच आम्ही महायुतीसोबत"
17
Defence Stocks : HAL सह 'या' ३ स्टॉक्सवर ब्रोकरेज बुलिश, ९५ टक्क्यांपर्यंत देऊ शकतात रिटर्न
18
महाराष्ट्राचं सरकार हे दिल्लीतून चालतंय, सुप्रिया सुळेंचा आरोप 
19
Maharashtra Election 2024 Live Updates: युगेंद्र यांच्या वडिलांच्या शोरुममध्ये पोलिसांची शोध मोहीम, बारामतीमध्ये खळबळ
20
अनिल देशमुखांवरील हल्ला हे रचलेले कुंभाड; भाजपाचा संशय, आजच सखोल चौकशी करण्याची मागणी

कांदा आवक घटली; भावात वाढ

By admin | Published: December 21, 2015 12:44 AM

खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केट यार्डमध्ये कांदा आवक घटून भावात वाढ झाली

चाकण : खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केट यार्डमध्ये कांदा आवक घटून भावात वाढ झाली. बटाट्याची आवक दुपटीने वाढून भाव स्थिर राहिले. तरकारी विभागात हिरवी मिरची, टोमॅटो, वांगी, भेंडी, दोडका, फरशी, वाटाणा, सिमला मिरचीची आवक वाढली. तर, फ्लॉवर, दोडका, कारली, सिमला मिरचीच्या भावात वाढ झाली. पालेभाज्यांच्या बाजारात मेथी, कोथिंबीर व शेपूची आवक घटली; तर पालकची आवक वाढूनही भाव स्थिर राहिले. जनावरांच्या बाजारात बैल, म्हैस, व शेळ्यामेंढ्यांच्या संख्येत घट झाली, तर जर्सी गायांच्या संख्येत, विक्रीत व किमतीतही वाढ झाली असून, या आठवडे बाजारात २ कोटी ३० लाख रुपयांची उलाढाल झाली असल्याची माहिती सभापती विलास कातोरे व सचिव सतीश चांभारे यांनी दिली.कांद्याला या आठवड्याच्या तुलनेत प्रतवारीनुसार ६५० ते १६०० रुपये, असा प्रतिक्विंटलला भाव मिळाला. बटाट्याला या आठवड्यात ७०० ते ११०० रुपये, असा प्रतिक्विंटलला प्रतवारीनुसार भाव मिळाला. येथील मार्केट यार्डमध्ये कांद्याची एकूण आवक ३०४३ क्विंटल झाली. गेल्या शनिवारच्या तुलनेत ही आवक ४५७ क्विंटलने घटूनही कांद्याच्या भावात १०० रुपयांनी वाढ झाली. कांद्याचा कमाल भाव १५०० रुपयांवरून १६०० रुपयांवर पोहोचला. तळेगाव बटाट्याची एकूण आवक १२०० क्विंटल झाली. गेल्या शनिवारच्या तुलनेत ही आवक ६५५ क्विंटलने वाढून बटाट्याचा कमाल भाव ११०० रुपयांवर स्थिरावला. जळगाव भुईमूग शेंगांची एकूण आवक ४० क्विंटल झाली व भाव ५००० रुपयांवर स्थिरावला. बंदूक भुईमूग शेंगांची एकूण आवक २० क्विंटल होऊन कमाल भाव ६५०० रुपयांवर स्थिरावला. लसणाची एकूण आवक २ क्विंटल झाली असून, लसणाला कमाल भाव १४०० रुपये मिळाला. येथील व्यापारी रवींद्र बोराटे यांच्या गाळ्यावर अहमदाबाद येथून १० टन कोबीची; जोधपूरहून १५ टन गाजर; तर इंदौर येथून दोन ट्रक मटारची आवक झाली.खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या राजगुरूनगर येथील पालेभाज्यांच्या बाजारात ३ लाख ६२ हजार जुड्या मेथीची आवक झाली, तर २ लाख २२ हजार जुड्या कोथिंबीरीची आवक झाली. तसेच २५ हजार जुड्या शेपूची आवक झाली. बाजार समितीच्या शेलपिंपळगाव आवारात मेथीची १०हजार ७००, कोथिंबीरीची १६ हजार ५०० व शेपूची ३००० जुड्यांची आवक झाली. चाकणला हिरव्या मिरचीची एकूण ४२५ पोती आवक झाली व मिरचीला १५० ते २०० रुपये असा प्रतीदहा किलोंसाठी भाव मिळाला .शेतीमालाची एकूण आवक व बाजारभाव पुढील प्रमाणे : कांदा : एकूण आवक - ३०४३ क्विंटल. भाव क्रमांक १-१६०० रुपये, भाव क्रमांक २-१२०० रुपये, भाव क्रमांक ३-६५० रुपये.बटाटा : एकूण आवक १२०० क्विंटल. भाव क्रमांक १-११०० रुपये, भाव क्रमांक २-८०० रुपये, भाव क्रमांक ३-७०० रुपये.फळभाज्या : चाकण येथील फळभाज्यांच्या बाजारात एकूण आवक डागांमध्ये व प्रती १० किलोंसाठी डागांना मिळालेले भाव पुढील प्रमाणे :टोमॅटो- ५९० पेट्या (१३० ते १८० रुपये ), कोबी- ६० पोती ( ५० ते ८० रुपए ), फ्लॉवर- ४५० पोती ( ८० ते १२० रुपये ), वांगी- २७० डाग (२५० ते ३०० रुपये.), भेंडी- ३४५ डाग (२०० ते २५० रुपये ) , दोडका- १०१ डाग ( ४०० ते ४५० रुपये ) ,कारली- १४५ डाग ( ३५० ते ४०० रुपये ), दुधीभोपळा- २२० डाग ( ८० ते १०० रुपये ) , काकडी- २२० पोती ( ७० ते १०० रुपये ), फरशी- ११० पोती ( ३०० ते ३५० रुपये), वालवड- ( आवक नाही ), गवार- ४५ डाग ( ४५० ते ५०० रुपये ), ढोबळी- ३८० डाग ( २०० ते २५० रुपये ), चवळी- (आवक नाही ) वाटाणा- ५५० पोती ( ३०० ते ३५० रुपये ). शेवगा- आवक नाही. गाजर- २०० पोती ( १३० ते १४० रुपये )पालेभाज्या : चाकण येथील पालेभाज्यांच्या बाजारात भाज्यांची एकूण आवक जुड्यांमध्ये व प्रती शेकडा जुड्यांना मिळालेले भाव पुढील प्रमाणे : मेथी - १५ हजार जुड्या ( ७०० ते ८०० रुपये ), कोथिंबीर - ८ हजार जुड्या ( ७०० ते ८०० रुपये ) , शेपू - ३ हजार जुड्या ( ५०० ते ६०० रुपये ) , पालक - २ हजार जुड्या ( ४०० ते ५०० रुपये ) .