शहरं
Join us  
Trending Stories
1
आतिशी यांच्या शपथविधीसाठी आलेले हे IAS अधिकारी कोण? जे केजरीवाल बोलत असताना हात जोडून उभे होते
2
महाविकास आघाडीत कोणतीही बिघाडी होणार नाही; खासदार निलेश लंके यांना आत्मविश्वास
3
पुण्याहून लातूरकडे निघालेली भरधाव ट्रॅव्हल्स उलटली; गाढ झाेपेत असलेले ५ प्रवासी जखमी!
4
रिपाइं आठवले गटाचे उल्हासनगर शहर जिल्हाध्यक्ष भगवान भालेराव यांची पक्षातून हकालपट्टी
5
धक्कादायक! उल्हासनगरातील अपंग शासकीय बालगृहातून २ गतिमंद व कर्णबधीर मुले गायब
6
तुळजापुरातील बसस्टँडवर ओळख; लातूरमध्ये अत्याचार! संशयित शिक्षकासह तिघांविरुद्ध गुन्हा
7
वाळवा, शिराळा, पलूस, तासगाव तालुक्यासह सांगली जिल्ह्यात पुन्हा जोरदार पाऊस
8
उजनी परिसराला पावसाने झाेडपले; वाहतूक ठप्प! एकंबी, मासुर्डी रस्ता गेला पाण्याखाली
9
थरकाप उडवणारी घटना...! आता दुसरी 'श्रद्धा वालकर'...! फ्रिजमध्ये आढळले 29 वर्षांच्या तरुणीचे 30 तुकडे 
10
IND vs BAN 1st Test : चेन्नईच्या मैदानावर विराटचा जल्लोष, शाकिब आउट झाल्यानंतर केला सुपर डान्स! बघा Video
11
VIDEO: मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडने घेतला 'सुपरमॅन' कॅच; हवेत उडी घेऊन टिपला झेल
12
हमीभावापेक्षा अधिक दराने कापूस, सोयाबीनची खरेदी होणार- देवेंद्र फडणवीसांनी दिलं वचन
13
“शिंदे, फडणवीस सर्वांसमोर उमेदवार देऊ, २८८ जागा लढू, राज्यात महाशक्तीचा CM दिसेल”: बच्चू कडू
14
“अमूल तूप कधीही तिरुपतीला पाठवलेले नाही”; लाडू प्रसाद वादावर कंपनीने दिले स्पष्टीकरण
15
आतिशी दिल्लीच्या मुख्यमंत्री बनल्या, पण सरकार चालवण्यासाठी असतील मोठी आव्हाने!
16
IND vs BAN : पंत OUT होणार असं समजून राहुलची तयारी पण फजिती; सिराजला पिकला हशा, Video
17
₹600 कोटींची ऑर्डर मिळताच शेअरच्या खरेदीसाठी उडाली गुंतवणूकदारांची झुंबड, 14% नं वधारला भाव
18
PM मोदी - मुहम्मद युनूस यांच्यात अमेरिकेत बैठक नाही, बांगलादेशने पुढे केलं 'हे' कारण
19
दिल्लीला मिळाल्या तिसऱ्या महिला मुख्यमंत्री! आतिशी यांच्यासह आणखी ५ मंत्र्यांनी घेतली शपथ
20
काँग्रेस नेते राजभवनावर, घेतली राज्यपाल राधाकृष्णन यांची भेट; पण नेमके कारण काय?

आवक घटल्याने कांदा वधारला

By admin | Published: November 09, 2015 1:56 AM

खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केट यार्डात कांद्याची आवक घटली. यामुळे भावात वाढ झाली. बटाट्याची आवक वाढून भावही वाढले.

चाकण : खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केट यार्डात कांद्याची आवक घटली. यामुळे भावात वाढ झाली. बटाट्याची आवक वाढून भावही वाढले. जळगाव भुईमूग शेंगा, गवार, शेवगा आवक वाढली. फळभाज्यांच्या बाजारात हिरव्या मिरचीची आवक घटून भावही घटले. लसणाची आवक व भावही स्थिर राहिले. पालेभाज्यांच्या बाजारात मेथीची आवक सहा पटीने, तर कोथिंबिरीची आवक दुपटीने वाढून भाव घटले. जनावरांच्या बाजारात बैल, म्हैस व शेळ्या-मेंढ्यांच्या संख्येत वाढ होऊन विक्रीतही वाढ झाली.कांद्याची आवक १६० क्विंटलने घटली व कांद्याला ८०० ते ४००० रुपये असा प्रतिक्विंटलला भाव मिळाला. बटाट्याची आवक या आठवड्यात ३१५ क्विंटलने वाढली. एकूण १०१५ क्विंटल आवक होऊन बटाट्याला या आठवड्यात ४०० ते १२०० रुपये असा प्रतिक्विंटलला प्रतवारीनुसार भाव मिळाला. बाजारात एकूण उलाढाल २ कोटी ६ लाख ९८ हजार रुपये झाली.जळगाव भुईमूग शेंगांची एकूण आवक ११० क्विंटल झाली. त्यांचे भाव ५००० रुपयांवर स्थिरावले. बंदूक भुईमूग शेंगांची एकूण आवक ५० क्विंटल होऊन कमाल भाव ६५०० रुपयांवरून ७००० रुपयांवर पोहोचले. लसणाची आवक ३ क्विंटल झाली. लसणाला ७०० रुपयांचा कमाल भाव मिळाला.खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या राजगुरुनगर येथील पालेभाज्यांच्या बाजारात ७० हजार जुड्या मेथीची आवक झाली, तर ८० हजार जुड्या कोथिंबिरीची आवक झाली व ६ हजार जुड्या शेपूची आवक झाली. बाजार समितीच्या शेलपिंपळगाव आवारात कोथिंबिरीची १००० व कोथिंबीरच्या ५०० जुड्यांची आवक झाली. चाकणला हिरव्या मिरचीची एकूण आवक ३०० पोती झाली व मिरचीला ८० ते १२० रुपये असा प्रतिदहा किलोसाठी भाव मिळाला .शेतीमालाची एकूण आवक व बाजारभाव पुढीलप्रमाणे : कांदा - एकूण आवक : ४८० क्विंटल : भाव क्रमांक १ - ४००० रुपये, भाव क्रमांक २ - ३००० रुपये, भाव क्रमांक ३-८०० रुपये.बटाटा : एकूण आवक १०१५ क्विंटल. भाव क्रमांक १- १२०० रुपये , भाव क्रमांक २- ८०० रुपये, भाव क्रमांक ३-४०० रुपये.फळभाज्या : टोमॅटो- २५५ पेट्या (२८० ते ३३० रु), कोबी- २५० पोती (५० ते ६० रु. ), फ्लॉवर- ४६० पोती (५० ते १०० रु.), वांगी आवक नाही. भेंडी- २५० पोती (२५० ते ३०० रुपये) , दोडका- १२० पोती (३०० ते ३५० रुपये), कारली- २६० डाग (१५० ते २५० रुपये), दुधीभोपळा- १५० पोती (८० ते १२०), काकडी- १५० पोती (१०० ते १५० रुपये), फरशी - ६० पोती (५०० ते ६०० रुपये), वालवड- (आवक नाही), गवार-१७० डाग (३०० ते ४०० रुपये), ढोबळी- ३०० डाग (८० ते १३० रुपये), चवळी व वाटाणा - (आवक नाही) शेवगा- ११० डाग (३०० ते ४०० रुपये). (वार्ताहर)