ओतूर : ओतूर येथे रविवारी १३ हजार १९८ कांदा पिशव्यांची आवक होऊन नं. १ गोळा कांद्यास प्रतवारीनुसार १० किलोस २५० ते ३०० रुपये बाजारभाव मिळाला. कांदा बाजारभावात थोडी वाढ झाली, तर बटाट्याच्या भावात घसरण झाल्याची माहिती जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती ॲड. संजय काळे व उपसभापती दिलीप डुंबरे यांनी दिली.
ओतूर बाजारात नवीन कांद्याची आवक होत आहे. प्रतवारीनुसार १० किलोस ५० ते २७० रुपये बाजारभाव मिळाला. या भावात गुरुवारपेक्षा १० रुपयांची घसरण झाली आहे.
रविवारी जुन्या कांद्याचे प्रतवारीनुसार १० किलोचे भाव : कांदा नं. १ (गोळा)- २५० ते ३०० रुपये.
कांदा नं. २--१७० ते २५० रुपये.
कांदा नं. ३ (गोल्टा) १०० ते १७० रुपये.
कांदा नं. ४ (बदला) ५० ते १२० रुपये.
बटाटा बाजार: रविवारी १२४ बटाटा पिशव्यांची आवक होऊन प्रतवारीनुसार १० किलोस ४० रुपये ते १२५ रुपये भाव मिळाला १५५ रुपयांची घसरण झाली, अशी माहिती ओतूर मार्केटचे कार्यालय प्रमुख दीपक मस्करे यांनी दिली.