शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'मी पुढील निवडणूक पाहणार की नाही..."; रोहिणी खडसेंसाठी एकनाथ खडसेंची भावनिक साद
2
दादर-माहीमची निवडणूक अटीतटीची होईल की एकतर्फी? अमित ठाकरे म्हणाले, "मी तुम्हाला..."
3
विधानसभेसाठी सूक्ष्म नियोजन... लोकसभेनंतर वेगळी स्ट्रॅटेजी; भाजप महाराष्ट्रात 'कमबॅक' करणार?
4
विलंबामुळे वाढले टेन्शन, हुकणार होती लग्नाची गाडी; मुंबईवरून निघालेल्या नवरदेवासाठी थांबविली रेल्वे!
5
जळगाव शहर मतदारसंघातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर गोळीबार 
6
कैलाश गहलोत भाजपात जाणार, रविवारी दिला होता मंत्रिपदासह आपचा राजीनामा
7
संजय निरुपम यांनाच वोट करा! जान्हवीचा व्हिडिओ पाहून चाहत्यांचा संताप, म्हणाले- "किती पैसे मिळाले?"
8
एकावर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' कंपनी; शेअरमध्ये तुफान तेजी, कोणता आहे हा स्टॉक?
9
Maharashtra Vidhan Sabha 2024: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’चे प्राबल्य कायम राहणार का? 
10
"ती कोणाची तरी पत्नी आहे...", सलमानने ऐश्वर्या-अभिषेकच्या लग्नावर सोडलं होतं मौन
11
PM नरेंद्र मोदी ब्राझीलला पोहोचले, जोरदार स्वागत; जी-२० शिखर परिषदेत सहभागी होणार! 
12
हातात कोयता, भिंतींवर रक्त अन्..; 'सिंघम अगेन'नंतर टायगर श्रॉफच्या Baaghi 4 ची घोषणा, रिलीज डेटही जाहीर
13
तेलंगणा सरकारच्या नोटीसवर दिलजीत दोसांझचं भर कॉन्सर्टमध्येच खरमरीत उत्तर, म्हणाला...
14
जगभर: अमेरिकेत गर्भनिरोधक गोळ्या खरेदीचा सपाटा! विक्री पाहून कंपन्यांचेही डोळे पांढरे
15
Ruturaj Gaikwad वर अन्याय? Devdutt Padikkal नं कशाच्या जोरावर मारली बाजी? जाणून घ्या सविस्तर
16
भाजप सरकारचा मुंबई लुटण्याचा डाव, तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डींचा आरोप 
17
रस्ते फुलले, प्रचंड उत्साह आणि देवाभाऊंचा जयजयकार; नागपुरात देवेंद्र फडणवीसांचं शक्तिप्रदर्शन
18
Zomato Share Price : ५०० पार जाणार Zomato चा शेअर; ब्रोकरेज बुलिश, पाहा काय म्हटलंय कंपनीनं?
19
War 2 मध्ये हृतिक रोशनसोबत थिरकताना दिसणार ही अभिनेत्री? चाहत्यांची उत्सुकता शिगेला
20
कांद्याचे भाव का वाढले, सोयाबीनच्या किमतीचं काय? कृषिमंत्र्यांनी दिलं असं उत्तर 

कांदा, बंदूक भुईमूग, लसणाचे भाव स्थिर

By admin | Published: April 24, 2017 4:33 AM

चाकण (ता. खेड) येथील महात्मा फुले मार्केट यार्डमध्ये कांद्याची आवक घटूनही भाव स्थिर राहिले. कांदा, बंदूक भुईमूग शेंगा

आसखेड : चाकण (ता. खेड) येथील महात्मा फुले मार्केट यार्डमध्ये कांद्याची आवक घटूनही भाव स्थिर राहिले. कांदा, बंदूक भुईमूग शेंगा व लसणाचे भावही स्थिर राहिले. हिरव्या मिरचीची प्रचंड आवक झाल्याने मिरचीचे भाव गडगडले. बटाट्याची आवक घटल्याने भावात मोठी वाढ झाली. या आठवड्यात चाकण बाजारात कांदा व बटाट्याची किरकोळ आवक झाली. हिरव्या मिरचीची प्रचंड आवक झाल्याने भाव कोसळले. जळगाव भुईमूग शेंगांची काहीच आवक झाली नाही. लसूण व बंदूक भुईमूग शेंगांची आवक व भावही स्थिर राहिले.राजगुरुनगर बाजारात हिरवी मिरची, टोमॅटो, वांगी, भेंडी, दोडका, कारली, दुधीभोपळा, ढोबळी मिरची, वाटाणा, वालवड, शेवगा व चवळीची काहीच आवक झाली नाही. शेलपिंपळगाव उपबाजारात फळभाज्यांची काहीच आवक झाली नाही. चाकणला पालेभाज्यांच्या बाजारात शेपू, पालक व मेथीची किरकोळ आवक झाली. राजगुरुनगर बाजारात पालक भाजीची, तर शेलपिंपळगावच्या उपबाजारात शेपू, मेथी व पालक भाजीची काहीच आवक झाली नाही. जनावरांच्या बाजारात जर्शी गाय, बैल व म्हशींच्या संख्येत मोठी वाढ झाली. शेळ्या-मेंढ्यांची संख्या घटूनही भाव स्थिर राहिले. एकूण उलाढाल २ कोटी २५ लाख रुपये झाली. चाकण बाजारात कांद्याची एकूण आवक २ हजार ९०० क्विंटल झाली. गेल्या शनिवारच्या तुलनेत ही आवक ३ हजार ४०० क्विंटलने घटूनही कमाल भाव ६५० रुपयांवर स्थिरावले. तळेगाव बटाट्याची एकूण आवक ६५० क्विंटल झाली. गेल्या शनिवारच्या तुलनेत ही आवक २५० क्विंटलने घटल्याने भावात २०० रुपयांची वाढ झाली. बटाट्याचा कमाल भाव ८०० रुपयांवरून १,००० रुपयांवर पोहचला. जळगाव भुईमूग शेंगाची काहीच आवक झाली नाही. बंदूक भुईमूग शेंगांची एकूण आवक २ क्विंटल झाली असून, या शेंगांना ६ हजार रुपये भाव मिळाला. गेल्या शनिवारच्या तुलनेत या शेंगांची आवक व भावही स्थिर राहिले. हिरव्या मिरचीची एकूण आवक ४१० क्विंटल झाली. गेल्या शनिवारच्या तुलनेत ही आवक २४५ क्विंटलने वाढल्याने भावात घसरण झाली. हिरव्या मिरचीला २०० ते ३०० रुपये असा कमाल भाव मिळाला. राजगुरुनगरच्या मुख्य बाजारात पालक भाजीची काहीच आवक झाली नाही. तर शेलपिंपळगाव उपबाजारात फळभाज्यांसह मेथी, शेपू व पालक भाजीची काहीच आवक झाली नाही.