दरम्यान उपबाजारात मंगळवारी झालेल्या लिलावात १३ हजार कांदा गोणी विक्रीस आल्या होत्या. पावसाळी वातावरण व साठवणुक करण्यात आलेला कांदा सडेल या भीतीने शेतकरी आता कांदा विक्रीस आणत असल्याने आळेफाटा उपबाजारात कांदा आवक वाढली आहे. कांदा भाव मात्र स्थिर राहिले आहेत. परराज्यातील कांदा विक्रीस येण्याचे प्रमाण वाढत असून त्यातच मागणी कमी असल्याने भाव हे गेल्या महिन्यापासून स्थिर आहेत. आज शुक्रवारी 18 हजार शंभर कांदा गोणी विक्रीस आल्या असल्याचे सचिव रूपेश कवडे व कार्यालयप्रमूख प्रशांत महांबरे यांनी सांगितले.
आज झालेल्या कांदा लिलावात प्रतवारीप्रमाणे प्रतिदहा किलो मिळालेले भाव असे एक नंबर गोळा कांदा १८० ते २०० रुपये दोन नंबर कांदा १५० ते १८० रुपये तीन नंबर कांदा ८० ते १५० रुपये चार नंबर कांदा नंबर ३० ते ८० रुपये.