शहरं
Join us  
Trending Stories
1
फडणवीसांसारखीच झाली एकनाथ शिंदेंची अवस्था?; २०२२ च्या घटनेची पुनरावृत्ती होण्याची शक्यता
2
"...म्हणून भाजपाचा मुख्यमंत्री होण्यासाठी एकनाथ शिंदेंनी रस्ता मोकळा करावा"
3
"राज ठाकरे यांना फसवलं, इव्हीएममुळेच महायुती जिंकली’’, मनसेचा गंभीर आरोप
4
Jacqueline Fernandez : "तिला काहीच..."; सुकेशकडून महागड्या भेटवस्तू घेणाऱ्या जॅकलिन फर्नांडिसच्या वकिलांचा युक्तिवाद
5
IRCTC ची ब्लॅक फ्रायडे ऑफर, स्वस्तात मिळेल फ्लाइट तिकीट आणि 'ही' सुविधा...
6
"बाप आखिर बाप होता है", मुलगी पराभूत झाल्यानंतर विजयी पित्याचे बॅनर चर्चेत!
7
 स्वबळावर बहुमताजवळ, तरीही मुख्यमंत्रिपदावर अडलंय घोडं, भाजपासमोर आहेत या अडचणी
8
ऐश्वर्या रायबाबत भावजयचीही क्रिप्टिक कमेंट, अभिनेत्रीसोबत कधीच फोटो शेअर करत नाही; कारण...
9
Maharashtra Politics: महाराष्ट्रात बिहार मॉडेल लागू होणार नाही; भाजपच्या नेत्याने आतली बातमी सांगितली; मुख्यमंत्रिपदावर सस्पेन्स कायम
10
"काँग्रेसच्या आमदारांनी आता भाजपात विलीन व्हावं’’, भाजपच्या नेत्यानं दिला खोचक सल्ला
11
जगातील टॉप ५० हायराईज टॉवरपैकी एकात आहे Rohit Sharmaचं घर; किंमत, वैशिट्ये पाहून अवाक् व्हाल
12
Hit and Run Video: अहिल्यानगरमध्ये कारचालकाने चौघांना चिरडले, घटना सीसीटीव्हीत कैद 
13
Fact Check : बॉलिवूड अभिनेते असरानी यांचा भाजपावर टीका करणारा 'तो' Video दिशाभूल करणारा
14
'सन ऑफ सरदार' फेम दिग्दर्शकाच्या १८ वर्षीय मुलाचं भीषण अपघातात निधन
15
माढ्यातील निवडणुकीत एक घोषणा ठरली गेमचेंजर; अभिजीत पाटलांना कसा मिळाला विजय?
16
बांगलादेशात इस्कॉनला लक्ष्य का केलं जातंय? एकूण मंदिरं किती आहेत?
17
Guru Pradosh 2024: कर्जमुक्त आयुष्यासाठी करा गुरु प्रदोष व्रत; दाखवा दही भाताचा नैवेद्य!
18
Rahul Gandhi : राहुल गांधींनी अदानींच्या अटकेची केली मागणी; विरोधकांच्या गदारोळानंतर लोकसभा तहकूब
19
Infosys Employee Bonus : इन्फोसिसच्या कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; कंपनीनं केली ८५ टक्के बोनस देण्याची घोषणा
20
Sonia Meena IAS: माफियांनाही फुटतो घाम, सुनीता मीणांना का म्हणतात दबंग अधिकारी?

कांदा, बटाटा दरात वाढ, गवार भावात घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2018 11:03 PM

चाकण बाजार समिती : कांद्याच्या आवकेत वाढ, मात्र बटाट्याच्या आवकेत घट

चाकण : खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केट यार्डमध्ये कांदा आवक वाढूनही भावात वाढ झाली. बटाट्याची आवक घटून भावात वाढ झाली. कांद्याला १३०० रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला. बटाट्याला १८०० रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला.

तरकारी विभागात गवार व शेवग्याचे भाव घटले. टोमॅटोची ९४७ क्रेट्स आवक झाली. टोमॅटोला १००० रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला. हिरव्या मिरचीची आवक घटून भावही घटले. बाजारात मिरचीची ३१५ पोत्यांची आवक झाली. मेथी, कोथिंबिरीचे भाव घटले. गाय-बैलांची विक्री घटली. बाजारात एकूण दोन कोटी चाळीस लाखांची उलाढाल झाली असल्याची माहिती सभापती चंद्रकांत इंगवले यांनी दिली.येथील बाजारात कांद्याची एकूण आवक ४०० क्विंटल होऊन कांद्याला कमाल १३०० रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला. तळेगाव बटाट्याची एकूण आवक ९१३ क्विंटल होऊन बटाट्याचा कमाल भाव १८०० रुपये प्रति क्विंटल झाला. बटाट्याची आवक ९१३ क्विंटल झाली. भुईमूग शेंगांची आवक ७ क्विंटल झाली असून, भुईमूग शेंगांना ४५०० रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला. लसणाची एकूण ३ क्विंटल आवक झाली. लसणाचा कमाल भाव १८०० रुपयांवर स्थिर राहिला. चाकण बाजारात हिरव्या मिरचीची एकूण ३१५ पोती आवक झाली. मिरचीला १५०० ते २२०० रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला.सणासुदीमुळे फळांची आवक घटलीपुणे : सणासुदीच्या काळात फळांची तोडणी न झाल्याने रविवारी मार्केट यार्डातील फळबाजारात फळांची आवक घटल्याचे पाहायला मिळाले. मागणीच्या तुलनेत आवक कमी प्रमाणात होत असल्याने बोरे, कलिंगड, डाळिंब, चिक्कू, संत्रा आणि मोसंबीच्या भावात दहा ते वीस टक्क्यांनी वाढ झाली. काश्मीर पट्ट्यात बर्फवृष्टी सुरू झाल्याने सफरचंदाची आवक घटून भाव पेटीमागे शंभर रुपयांनी वधारले. तर, राज्यात पडलेल्या दुष्काळामुळे डाळिंब, लिंबे, मोसंबी तसेच संत्रीच्या आकारावर परिणाम झाला असल्याचे व्यापाऱ्यांनी नमूद केले. दरम्यान, आवक वाढल्याने पेरू, पपईच्या भावात घट झाली. इतर फळांची आवक-जावक कायम असल्याने भाव स्थिर राहिले.रविवारी येथील फळबाजारात अननस ७ ट्रक, मोसंबी ७० टन, संत्री १२ टन, डाळिंब १०० ते १५० टन, पपई २० ते २५ टेम्पोे, लिंबाची २ ते ३ हजार गोणी, चिक्कू १ हजार डाग, पेरु ७०० ते ६०० क्रेटर्स कलिंगड १० ते १५ टेम्पो, खरबुज ८ ते १० टेम्पो, सफरचंद ४ ते ५ हजार पेटी आवक झाली.फळभाज्या :४चाकण येथील फळभाज्यांच्या बाजारात एकूण आवक डागांमध्ये व प्रती १०० किलोंसाठी डागांना मिळालेले भाव पुढीलप्रमाणे : टोमॅटो - ९४७ पेट्या ( ५०० ते १००० रु. ), कोबी - २१० पोती ( ३०० ते ६०० रु. ), फ्लॉवर - २०० पोती ( ८०० ते १४०० रु.),४वांगी - २२३ - पोती (२५०० ते ३५०० रु.), भेंडी - २५६ डाग (२००० ते ३००० रु.), दोडका - १९० पोती ( १००० ते २००० रु.),४कारली - ३१५ डाग ( १००० ते २००० रु.), दुधीभोपळा - १४२ पोती ( ८०० ते १००० रु.), काकडी - २१५ पोती ( ८०० ते १६०० रु.),४फरशी - ५२ पोती ( ३००० ते ४००० रु.), वालवड - १७२ पोती (३५०० ते ४५०० रु.), गवार - १० पोती ( ४००० ते ५००० रु.),४ढोबळी मिरची - २१० डाग ( १००० ते २००० रु.), चवळी - १४० पोती ( १००० ते २००० रु. ), वाटाणा- ( आवक नाही ),४शेवगा - ४० डाग ( २५०० ते४५०० रुपये ). 

टॅग्स :PuneपुणेChakanचाकणmarket yardमार्केट यार्ड